एकदा एक राजा नेहमी प्रमाणे शिकारीला जंगलात गेला असता नेहमी प्रमाणे सैन्याची आणि त्याची चुकामूक झाली,,, नेहमी प्रमाणे मग जंगलातील आदिवासींनी राजाला पकडून नेलं,,, पुढे त्यांच्यात देवीला राजाचा बळी द्यायचा त्यासाठी योग्य वेळ मुहूर्त पाहून दुसऱ्याच दिवशी सक्काळी सक्काळी सूर्य उगवतात देवीला बळी द्यायचं ठरलं,, त्यासाठी राजाला वधस्तंभावर दोरखंडाने बांधण्यात आल,,, परन्तु बळी चा मुहूर्त पाहणाऱ्या पेक्षा राजाचं नशीब जोरावर होत,, उद्याच्या मरणाची वाट पाहणारा राजा असहाय होत वर देवा कडे पहात होता संध्याकाळ झाली रात्र झाली आणि अचानक कुठूनसा एक पोपट उडत उडत तिथे आला त्याने राजाला त्या अवस्थेत पाहिलं आणि हळू हळू तो त्या दोरखंडाच्या गाठी सोडवू लागला, राजाला तर देवच पावला होता थोड्याच वेळात राजा त्या दोरखंडातुन मुक्त झाला राजाला खूप आंनद झाला तत्क्षणी राजाने त्या पोपटाला सोबत घेत आपल्या राज्याकडे निघाला इकडे पहाट झाली होती आदिवासी जागे होत पहातात तो काय राजा गायब झाला होता,,, इकडून आदिवासी तिकडून राजाचे सैनिक देखील तो पर्यंत शोधायला बाहेर पडले होते सुदैवाने तो पर्यंत राजा आपल्या सैनिकांसह राज्या...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......