Skip to main content

Posts

Showing posts from July 29, 2012

जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे ,,,,

एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद सुरु असतो लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि  " जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे (पैशामुळे) .........  ज्या माणसाकडे पैसा नाही, संपत्ती नाही....... त्याला काही किंमत नाही.  माणूस ओळखतो........ जाणतो....... आणि बोलतो ते फक्त पैशानेच. " यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि " असं काही नाहीये. " पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते कि पैशालाच जास्त महत्व आहे. तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत म्हणून लक्ष्मी माता म्हणते,  " ठीक आहे. मी सिद्ध करून दाखवते. मग तरी मान्य कराल?  " विष्णू भगवान हसून म्हणतात, " हो चालेल." त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक दृश्य दाखवते. -  एक शोकमग्न अंत्ययात्रा चालली असते... लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते....  आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे लोक आपण कुठे जातोय हे विसरून पैसे गोळा करू लागतात. लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत म्हणते,  " पाहिलंत? पैश्या समोर माणूस आपण कोणाला तरी कायमचे गमावून बसलोय हे दुखः देखील विसरतो....

कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट?????????????

काल एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज  !   आणि ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत , तर ती ही खाउनच टाकतात .  शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे .   संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही , कुणालाच तेवढी उसंत नसते . स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक महाराज  स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास " उपभोग " ता येतो मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा " रोड " आता " आर्थर रोड "  पाशी येऊन थांबलाय तिथं देशद्रोह्याना मिळणार् ‍ या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी , कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय .   तुम्ही लिहिलंत गीतारहस्य गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत , तर युती करुन सत्ता भोगतात " आप्तस्वकीय...