आज दोन बातम्यांनी मला अस्वस्थ केल कुठे चाललो आहोत आपण? सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचली डर्टी सिनेमात घातलेली विद्याची साडी ९० हजाराला विकली गेली ,,,आणि दुसरी बातमी ,, दुपारी बातम्या लावल्या आणि नागपुरातील आमदार डर्टी सिनेमा पाहायला कसे गेले, मग मिडीयावाले कसे आले मग त्यांच्या पासून लपण्यासाठी त्या आमदारांना काय काय उद्योग करावे लागले... ते रसभरीत वर्णन आणि त्या आमदारांचे मीडियापासून लपवलेले चेहेरे केविलवाणे दिसत होते. माझ्या लहानपणी कधी कधी ऐकायला मिळायचे कि अमुक हिरोचे कपडे,चप्पल,बुट किंवा काही हिरोईंस ची अंतर वस्त्र हि लीलावत विकली गेली पण हे सार तिकडे विदेशात घडत असे आणि मला त्यातलं विशेष काही कळत नसे पण हे लोन आता आपल्या कडे हि? माझा एक मित्र हि तो डर्टी सिनेमा पाहून आला. तसे त्याने एफबी वर टाकले हि होते त्याला डझनावारी कॉमेंटहि आल्या . मी काही अजून पहिला नाही पण ,,, चित्रपटाची कथा सांगायला लागू नये ईतकी सर्वांना परिचित आहे, त्यामुळे मी त्यावर काय बोलाव ? नावातच काही आहे, तरीही आपण तो सिनेमा पाहावा आणि त्यासाठी ईतका आटापिटा ? असो, वृत्तपत्रातील परीक्षण सांगते , सिने...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......