*||श्री गुरुवे नमः ||* अकबराच्या दरबारी जी नवरत्न होती त्यात एक *संगीत सम्राट तानसेन* देखील होते मात्र हे तानसेन कुठे घडले कि आभाळातून डायरेक्ट अकबराच्या दरबारात गेलं काय नाही तर त्यांना हि गुरु होते,, तर अशा या संगीत सम्राट तानसेनचे गुरु होते *स्वामी हरिदास,,,* एकदम व्रतस्थ साधक जणू साधुचं,, निःस्पृह असे ऋषितुल्य *स्वामी हरिदास* सर्वांना च आदरणीय वंदनीय आणि अशा गुरूंचे शिष्य होते संगीत सम्राट तानसेन,, या शिष्याला त्यांनी भरभरून दिले आणि तानसेनाने अपार मेहनत घेत त्यावर चार चांद लावले कीर्ती सर्वदूर पसरली आणि अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले एकदिवस अकबराने तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांना आमंत्रित केले सगळ्यात उच्च आसनावर गुरु स्वामी हरिदास विराजमामान झाले होते खालोखाल तानसेन दरबार खचाखच भरला होता, आता दोघे हि गुरुशिष्य गाणार होते त्यामुळे एक अत्यंनदाची लहर पसरली होती आणि श्रीस्वामी हरिदास यांचं गायन सुरु झालं सारा दरबार मंत्रमुग्ध होऊन गाणं श्रवण करत होता खूप मोठया टाळ्यांच्या कडकडाटात गाणं त्यांचं समाप्त झालं सारेजण त्यांचा जयजयकार करत होते आता वेळ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......