Skip to main content

Posts

Showing posts from August 25, 2019

कर्ण,अश्वसेन, आणि राज्यकर्ते

घर आमचं माळकरी त्यामुळे पूर्वी ग्रंथवाचन वारी ह्या सामान्य गोष्टी होत्या(आताशा अवघड वाटू लागल्यात ) त्यामुळे रामायण महाभारत हे ही रोजच्याच कथा मग हळूहळू शाळेत देखील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खास पुस्तक मुलांना वाचायला देत असत काही शिक्षक मग कधी कधी त्यावर प्रश्न ही विचारत ,, अशी ती ऐकण्याची वाचनाची गोडी लागलेला मी त्या ग्रंथ वाचनात हमखास कर्णाची गोष्ट येत असे,, इतकंच कळायचं की तो दुष्ट लोकांसोबत आहे आणि विजय पांडवांचाच होणार,, हे गणित ग्रंथ संपायच्या आधीच डोक्यात फिट्ट झालेलं असायचं, पण,,,, मनात मात्र कायम एक हुरहूर असायची जळो मेल ते युद्ध वैगेरे,, पांडव भले ही युद्ध जिंकोत पण कर्ण मात्र हरयला नको,,, कारण हळू हळू राधेय वैगेरे सारखी पुस्तक वाचनात येऊ लागली होती पण तरीही तो शत्रू सोबत लढतो हे मात्र मनात ठसलेलं असून ही तो हरू नये हे मनाने ठरवलेलं असायचं,, मग एक दिवस माझे आजोबा आईचे वडील ,, पुण्याला गावी गेलो असताना त्यांना मनातला प्रश्न विचारला,, की अस का ? मीच नव्हे माझे बरेच समवयस्क मित्र देखील असच म्हणतात की कर्ण जिंकायला हवा,,, अस नक्की खरच होत का?? *त्यावेळी आजोब...