Skip to main content

Posts

Showing posts from February 27, 2011

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

नीती आणि मूल्य

काल दुपारी मी रेडिओवर एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाण ऐकत होतो आणि नकळत त्या गाण्यात गुंतत गेलो खूप छान गाण आहे ते स्वतःची ओळख करून देणारे ,, स्वतःला जागे करणारे ,आपण कुणी तरी वेगळे आहोत मग कुणी का किती टिंगल करेना आपण आपला मार्ग सोडायचा नाही , जमेल तितक स्वतःला आरशात पाहायचं कारण मनुष्याचा खरा मित्र कोण असेल तर तो आरसा . या आरशात डोकावलं कि तुम्ही कोण आहात ते कळत. स्वत्वाची जाणीव होते स्वतःच वेगळेपण जाणवत , अशावेळी ज्याला जाणीव झालीय स्वत्वाची स्वतःत असलेला राजहंस पणाची त्याने तळ्यातला बद्कात राहू नये त्याच्या साठी मोत्याचा चारा वाट पाहत असतो त्याने झेप घ्यावी आसमंतात आणि हे राजहंस पण केवळ लाल बहादूर शास्त्रीं मध्ये होत. म्हणून ते वेगळे होते ,,,, बाकी सारीच तळ्यातली बदक .. ..... स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाची गोष्ट , शास्त्रीजींचा मुलगा सुनील याला अलिशान मोटार गाड्यांचे खूप आकर्षण , परंतु शास्त्रीजींकडे न स्वतःची गाडी नव्हती त्याला त्याची ईच्छा दाबून ठेवावी लागे, मात्र शास्त्रीजींकडे पंप्रधान म्हणून सरकारी गाडी होती . ती मात्र अत्यंत महागडी आ...