Skip to main content

Posts

Showing posts from November 18, 2018

इमर्जन्सी सीट आणि 2019

काल एका जवळपास रोजच विमानाने फिरणाऱ्या मित्राकडून विमानातील इमर्जन्सी सीट बद्दल माहिती मिळाली ह्या इमर्जन्सी सीट वर फक्त अशाच व्यक्तीला बसवतात जो वेळ आली की इमर्जन्सी सीट शेजारील मार्गातून जेव्हा विमान अडचणीत असेल तेव्हा या संकटकालीन मार्गातून आधी स्वतः न उतरता आधी इतर प्रवाशांना सुखरूप उतरवले त्यासाठी त्याच स्वतःच समान देखील त्या मार्गात प्रवाशांना अडचण होईल म्हणून ठेवू देत नाहीत तात्पर्य;- मोदी साहेब आम्ही देखील 2014 मध्ये देशाच्या या इमर्जन्सी सीटवर तुम्हला बसवलं ते गेली 60 वर्षे काँग्रेस याच सीट वर बसून मुस्लिम लांगुलचालन करत होती,हिंदूंवर अन्याय करत होती, राममंदिर 370 समान नागरी कायदा याला विरोध करत होती आज संपूर्ण देशाची सत्ता तुमच्या हाती सोपवून तुम्ही काय केलं? 15लाखाचा जुमला होता ठीक,, पण देशाबाहेरचा काळा पैसा? तो तर आला नाहीच पण पण सगळे व्यापारी सगळ्या बॅंका लुटून पुन्हा देशाबाहेर सुखरूप निघून गेले??? वर नोटबंदीच्या नावावर सर्वसामान्य माणसाला मी चोर नाही हे सिद्ध करावं लागलं तेव्हा सावधान आता 2019 ला पुन्हा मतदान येतंय पुन्हा तुम्हला या इमर्जन्सी सीटवर बसायला ...

थोर सैनिक आणि थोर त्यांचे कुटुंबीय

काय थोर असतात आपले सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय... रविवारी सकाळी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालतेवेळी एक गोळी दुर्दैवाने भारताच्या जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीचे जवान, ३६ वर्षीय लान्स नाईक रणजीत सिंग यांच्या डोळ्याच्या वर घुसते..... ूरवीर लान्स नाईक रणजितसिंग देशाच्या संरक्षणाच्या स्वतःच्या कर्तव्यात पूर्ण सन्मानाने परमोच्च बलिदान देत हुतात्मा होतात. सोमवारी रात्री तिरंग्या झेंड्यात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव जम्मू काश्मीर इथल्याच रामबाण जिल्ह्यातल्या सुलीगाम या त्यांच्या जन्मगावी लष्करी इतमामात पोचते. याच वेळी त्यांची पत्नी प्रसूत होते आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त होते. इवल्याश्या बाळाला छातीशी कवटाळून ती धीरोदात्त वीरपत्नी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या आपल्या नवऱ्याचे अंतिम दर्शन घ्यायला नदीकाठावर पोचते. अश्रूंच्या सागरात पतीचे अंतिम दर्शन घेते...चटकन स्वतःला सावरते....नुकत्याच जन्मलेल्या आपल्या कन्यारत्नाला चितेवर मांडून ठेवलेल्या आपल्या पतीच्या पायावर ठेवते.... ......आणि जमलेल्या हजारोंच्या जम...