||मातृ देवो भवः|| सार्या शिक्षित अडन्यांच्या चरणी,, काल परवा मदर्स डे साजरा केला आपण सर्वांनी काही तरी त्या निमित लिहाव असा वाट होत पण भट्टी जमत नव्हती आणि ,,, मघाशीच कलर्स वरील बालिका वधू हि सिरीयल पाहत होतो त्यातील प्रसंग ,,, जग्याची आई त्याला शोधत शोधत मुंबईत येते ,, आणि त्याची विनवणी करते कि,, आनंदी कशी तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे तिने तुझा जीव वाचवल आहे निदान त्याची तरी लाज बाळग अस परोपरीने सांगते ,, आम्हाला सार्यांना कशी तुझी गरज आहे तुझी दादी मां वाट पाहतेय वैगेरे वैगेरे,,,,,, पण जग्या ढिम्म ,,, उलट तोच आईला सांगतो तू मला समजून घे सारेच मला दोषी समजतात आधी वडील आले ते मला बोल लवून गेले आता तू मला बोल लावत आहेस,,,वैगेरे वैगेरे तेव्हा आई म्हणते जग्या अरे तू लहान होतस ना ! तुला बोलता हि येत नव्हत आणि मला तेव्हाही तुला काय पाहिजे तुझ काय म्हणन आहे ते समजत होत,,,,,, आता एक तर तू खूप मोठा झालायस आणि मी अडाणी अशिक्षित तुझ हे तर्कट माझ्या नाही लक्षात येत अस म्हणत हमसून हमसून रडत होती ती जग्याची आई ,,,,,,,,, डोळ्यात पाणी आल अक्षरशः ,,,, आणि साधारण १०...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......