Skip to main content

Posts

Showing posts from December 1, 2019

आई साधू आणि राजा

लहानपणी आई बरेचदा वशिष्ठऋषींनी रामाला राक्षसांना मारायला घेऊन गेल्याची गोष्ट सांगत असे,,, आणि माझा नेहमी गोंधळ उडत असे की वसिष्ठ ऋषी च जर यज्ञ करवून राम ला जन्माला घालू शकत होते त्याला शिक्षण देऊन लढाई करण्या योग्य बनवत होते आणि ते शिक्षण घेऊन जर राम राक्षसांचा निःपात करू शकत होता तर ,,,,🤔 मुळात वसिष्ठ स्वतःच हे काम करू शकत होते च की त्यासाठी राम जन्माला येण्याची तो मोठा होण्याची वाट का पहात होते ते स्वतः राक्षसांचा निःपात करू शकत नव्हते का❓,,,, आणि आईच उत्तर ठरलेलं असे *बाळा ते साधू होते* साधू ने साधुचं काम साधूने कराव राजाने राजाचं,,,, मी मात्र पटवून घ्यायला तयार नसे ,,,,, मात्र काल दुपारी घरी गेलो तर tv वर नातू कार्टून पहात होता त्यावर देखील एका म्हाताऱ्या आजारी राजाची गोष्ट चालू होती मी ही पाहू लागलो,,, सारे मंत्री संत्री प्रधान राजाच्या पायाशी चिंताक्रांत बसलेले असतात राजा निपुत्रिक असल्यामुळे आता राजाच्या पश्चात कोण❓ असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता,, सगळ्यांनी शेवटच्या दिवशी विचारलं काय मग राजा तुमच्या मनात तरी कसं काय काय करावं आम्ही कुणाला राजा बनवू? ,,, तेव्हा राजा म...