काल सहज गुगल बाबांशी बोलता बोलता आमच्या शाळेत ऑफ पिरियेडला आमच्या एका हिंदीच्या सरांनी सांगितलेली गोष्ट वाचनात आली,, #कफन प्रेमचंद यांची ती गोष्ट त्या आमच्या कुलकर्णी सरांची खूप आवडीची गोष्ट आणि मी ही त्यांचा लाडका झालो होतो,,, कारण ही तसच होतो सगळे लोक ती गोष्ट त्यांच्याकडून ऐकत ते ही ती आवडीने सांगत पण त्या गोष्टीवर प्रश्न फक्त एकदा मीच विचारला होता,,, गोष्ट आहे #कफन ची, गोष्ट आहे बुधिया, माधव, आणि घिसू ची,,, माधवची बायको बुधिया पोटुशी असते आजारपणा कंटाळून खोकुन खोलून जीव नकोस झालेला असतो आणि हे बाप बेटे पिऊन तरर असतात काही कामधंदा न करणारे आळशी ऐतखाऊ,, सुनेच ते विव्हळण ऐकून बाप मुलाला बोलतो की अरे बघ जरा तिला पण तो नालायक मुलगा बोलतो, साला मरणारच आहे तर अशी खोकून विव्हळून त्रास कशाला देते साली मरत का नाही?? संध्याकाळ होते तशी शेवटी बुधिया प्राण सोडते, घरात 18 विश्व दारिद्र्य आणि त्यातही बाप घिसू आणि मुलगा घिसू कर्मदरिद्री,, काही काम धंदा न करणारे फुकट कस मिळेल पाकीट मारून चोरी लांडी लबाडी करत लोकांना फसवत आज उद्याचा वायदा करत चरितार्थ चालवणारे हे बाप बेटे ,इथे खायला पैसे...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......