मी गेली काही वर्ष कच्छाला जातो,,, येथील मां आशा पुराच्या निमित्ताने साधारण दोन वर्षांपूर्वींची गोष्ट आहे सहज एका माणसाबरोबर ओळख झाली आणि गाडीत गप्पा सुरु झाल्या आणि थोड्याच वेळात त्याला एक sms आला त्यात अस लिहील होत "हा sms १० जणांना पाठवा तुमच भल होईल वैगेरे वैगेरे आणि ज्यानी ह्या sms कडे दुर्लक्ष केल त्याचं कस वाटोळ झाल" हा sms त्याने मला आवर्जून वाचून दाखवला कारण हा sms त्याला एका राजकीय पुढार्याच्या मोठ्या मुलाने पाठवला होता , मग आमच मग हे कस चुकीच आहे वैगेरे गप्पा सुरु झाल्या ,,,,,,, झाल त्यानानातर हा विषय मी पूर्णतः विसरून गेलो पण आज शनिवार सक्काळी सक्काळी मला पुन्हा असाच sms आला आणि त्यात सार वरील प्रमाणेच लिहील होत , माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याल दम वैगेरे दिला रागावलो हि ,,,,, आणि अचानक मला माझ्या लहान पणाचे दिवस आठवले मी लहान असताना संतोषी मत नावाचा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता . ज्याच्या त्याच्या घरी दरी शुक्रवार पाळण्यात येत होता मग त्या दिवसाची नवलाई आंबट चिंबट खावू नये वैगेरे वैगेरे,,,,, लहान होतो ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......