Skip to main content

Posts

Showing posts from May 26, 2019

विकास,,,,

चक्रव्यूह सिनेमातील एक भाग यातील माओवाद आणि नक्षली हे दोन शब्द वगळून हा सीन पहा आपल्याच विकासाच्या हव्यसा पायी सरकार कुठल्या थराला आपला इप्सित साध्य करत पहा  हे पाहून समजून घेतल्या नन्तर ही केवळ विकास हवा म्हणून मोदींची साथ देणं योग्य आहे विकासाचा भसम्या झालाय आपल्याला फक्त हवंय पण नक्की काय किती कशाला हे मात्र माहिती नाही आणि विचार करायची इच्छा ही नाही बस्स गंधारीने बांधली म्हणून आपण ही डोळ्यावर झापड चढवून घेतली आहेत फक्त हवंय,,,, मग त्यासाठी काहीही करावं लागलं कुठल्याही थराला जावं लागलं तरीही सरदार पटेलांची मूर्ती उत्तम उदाहरण  नर्मदेच्या खोऱ्यातील विस्थिपित केले गेलेल्या लोकांना आधी जागा द्यायला हवी की पटेलांच्या मूर्तीला ? पटेल सुध्दा ह्यासाठी मोदींना शापच देतील पण ऐकणार कोण? सरकारला साम दांम दंड भेद वापरून विकास करायचा आहे आणि आम्हाला तो हवा आहे मग विकासपुरुष आहेतच दंड थोपटून उभे त्या हवंय च्या नादात आम्ही कधी ओरबाडू लागलो आणि त्या राक्षसी लवासाला विकास अस नाव कधी देऊन बसलो ते अजूनही आम्हला कळलं नाही