मला आलेला एक इमेल शेअर करतोय, प्रत्येक पालकाने वाचण्यासारखा आहे गौरी पटवर्धन ----- जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३ वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट. जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत. तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू झाल्यापासून तिच्या मागे भुणभुण करत होता की, मला माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच! त्याच्या एका मित्राला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून आयफोन मिळाला, ते बघितल्यापासूनच ग्रेगच्या डोक्यात तो आयफोन पक्का बसला होता. त्याचं म्हणणं होतं की ’आता मी मोठा झालोय. मला आयफोन पाहिजेच आहे.’ शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं खूळ नाही. शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन! पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली. त्याच्यासाठी आणलेल्या नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती. आयफोन हातात आलेल्या मुलासाठी काही नियम हो...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......