लँपटाँप घेताना मला सांगण्यात आले की त्याच्यावर अॅन्टीव्हायरस प्रोग्राम टाकून घे... देणारा माझा मित्रच होता...मी विचारले याची आवश्यकता का? त्याने उत्तर दिले की आपला लॅपटॉपला आपण मोबाईल जोडतो किंवा मेमरी कार्ड जोडतो. कदाचित इंटरनेटचा वापर करताना सर्फिंग करताना अनेक हार्मफुल साईट्स असतात, छुपे व्हायरस असतात जे आपल्या नकळत आपल्या पी सी मधे येतात व सिस्टीम बिघडवतात. मी विचारले समजा लॅपटॉप कशालाच जोडला नाही तर मग कसे येतील? त्याने सांगितले की जोडावा तर लागतोच व समजा जोडला नाहीच तरी काही काळाने अनावश्यक फोल्डर वगैरे तयार होतात ते काढून टाकावे लागतात. काही प्रोग्राम अपडेट करावे लागतातच अपरिहार्य पणे जोडावा लागतोच. आपल्या नकळत व्हायरस येऊ शकतात. त्यासाठी अँटीव्हायरस असावाच व रोज अथवा ठराविक दिवसांनी पीसी स्कॅन करावा. मी सर्व ऐकले व समजून घेतले... वर वर अतिशय कॉमन दिसणारी ही गोष्ट मला बरंच शिकवून गेली... एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सी वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे. मी थोडा असा विचार केला... जर एखादा छोटा लॅपटॉप ज...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......