काल परवा पुण्यात होतो तेव्हा स्पेशल २६ पाहण्याचा योग आला अत्यंत सुंदर सिनेमा देशाच्या चार कोपर्यात विखुरलेले चार चोर त्यांची हि कथा , अक्षय कुमार , अनुपम खेर राजेश शर्मा आणि किशोर कदम एकत्र येवून सीबीआय अधिकारी आहोत असे भासवून दिल्लीतील एका मंत्र्याला लुटतात आणि सुरु होतो चोर पोलिसांचा खेळ ,,, अर्थातच घरात सापडलेला सारा काळा पैसा हे सीबीआय अधिकारी लुटून नेतात आणि नेत्यावर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायची पाळी येते. अर्थातच हि बातमी खर्या सीबीआय पर्यंत पोहचते आणि सुरु होतो तपास ,,,, "वेनस्डे" सारखा मास्टरपीस सिनेमा देवून स्पेशल २६ ने त्यावर कडी केली आहे वेनस्डे मध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे सदैव दहशतीत वावरणाऱ्या सामान्य माणसाची व्यथा नीरज पांडे ने मानाडली होती. आणि आता हि खर्या घटनेवर आधारित स्पेशल २६ २५ वर्षापूर्वी सीबीआयच्या एका नकली टीमने एका पेढीवर नकली छापा टाकून मोठी लुट मिळवली होती त्यावरच नीरजचा हा सिनेमा आहे यात हि चार जण थेट मंत्र्याच्या बंगल्यात घुसून त्याचे करोडो रुपये लुटून नेतात वर मंत्र्याचा कानाखाली हि जाळ काढतात. आणि आपण गुंतून जातो सिनेमाची पार्श्वभूम...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......