Skip to main content

Posts

Showing posts from June 26, 2011

बाल गंधर्व एक असली मर्द

काल पुण्यातून येताना बालगंधर्व सिनेमा पहिला ,,, त्यात एक हिरोईन स्वतः साठी साड्या घ्यायला एका दुकानात जाते . आणि बाल गंधर्वांनी जशी साडी अमुक अमुक रंगाची वेलबुट्टीची नाटकात घातली तसलीच साडी मला द्या .  पण दुकानदार त्या साड्या नाही दाखवू शकत .   आणि मग ती बाई बाल गंधर्वांच्या नाटकांचा पाढाच वाचते अरे दुर्भाग्या तू यातलं एकही नाटक नाही पहिला? तू बालगंधर्वांना नाही पाहिलास? अरे मग आयुष्यात तू येवून काय पाहिलस? ज्यांनी कुणी बाल गंधर्व नाही पहिला त्यांनी काही नाही पाहिलं,,,,अस म्हणत ती फणकार्याने निघून जाते ,,,,, एक हि साडी न घेता,,,,,,,,,, आणि हेच नेमक माझ्या शेजारच्या सीट वर घडत होत माझी बायको हि सिनेमा पाहण्यासाठी आली होती आधी वाटल होत हिला आवडेल कि नाही ? काय म्हणेल हि ? पण नाही तिला विचारलं कसा वाटला सिनेमा ? विचारल्यावर ती ईतकच म्हणाली , अहो मी सिनेमा पहिलाच नाही मी- मग काय पाहिलस ? ती- मी फक्त सुबोध भावेला पाहत होते ,,,,,, खरच बाल गंधर्व ईतके सुंदर दिसत होते कस काय हो हे सगळ जमत होत अस तर एखाद्या बाईला  हि नाही जमणार,,, दुधाची आंघोळ ती काय अत्तर...