Skip to main content

Posts

Showing posts from May 6, 2018

बाळा खूप लागलं तर नाही नारे 😌😔

आज मातृदिन खूप पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी ऐकलेली गोष्ट,,, एक आटपाट  नगर होत त्यात एक आई आपल्या तरुण मुलासह राहात होती,,, खूप काबाडकष्ट करून नवरा तरुण वयात वारल्यामुळे सारी जबाबदारी त्या माऊलीवर आली होती एकवेळ स्वतः जेवणार नाही पण मुलाला जेवायला ती जरूर घालत असे हळू हळू मुलगा मोठा होत होता म्हातारी आई या आशेवर जगत होती कि मुलगा शिकेल खूप मोठा होईल आणि मुलगा हि त्या प्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करत होता 10वीला त्याला खूप चांगले मार्क मिळाले मग तर आईवरची जबाबदारी आणखी वाढली खूप लटपटी खटपटी करून तिने मोठ्या कॉलेजात त्याला प्रवेश मिळवून दिला आता सुरु झाला मुलाचा पुढचा प्रवास,, आईचा आशीर्वाद घेऊन त्याने सुरवात केली पुढे 11वी 12वी लाही उत्तम गुण मिळवून तो कॉलेजात पहिला आला आता हळूहळू त्याला सारे ओळखू लागले कॉलेजातील सारी मुलं एक हुशार स्कॉलर विध्यार्थी म्हणून पाहू लागले कॉलेजच्या सरांचा तो लाडका बनला त्यातच मुलं मुली काही बाही कारणाने लगट करू लागले आणि त्यातच त्या मुलाचं लक्ष एका सौंदर्यवती कडे गेलं आणि तो वेडापिसा झाला ,,, **पाहता च ती बाला कलीजा खलास झाला ** अशी अ...