काही दिवसां पूर्वी आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला होता , तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे, आणि न कळत्यावेळी अनुभव हि घेतला आहे . पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल, एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती, आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती.. या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जाणारी काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ? आशी जाणीव करुन देणारी .. अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे. १०५ हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेतृत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई... महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......