आज तक तेज वर संजय सिन्हा रोजच गोष्ट सांगत असतात आज त्यांच्या एका परिचिताची गोष्ट , एक दिवस त्यांचे एक परिचित त्यांना फोन करून त्यांच्या घरगुती समस्येबद्दल बोलतात मुलाची तक्रार करतात की मुलगा हाता बाहेर चालला आहे पैसे काय उधळतो लहान सहान गोष्टीवरून घरात बहीण बघत नाही आई लगेच धावून जातो आकांड तांडव करतो मला काही तरी उपाय सांगा काय करू माझं तर डोकच चालायचं बंद झालंय? मी काय करू करता सावरता मुलगा असा हातून निसटून जातोय आणि मी काहीच करू शकत नाही बुद्धी भ्रष्ट झालीय काय करू काही उपाय सांगा? तो फोन वर बोलत होता आणि इकडे ते ऐकत गप्प झालो होतो मला माझे आणि त्या परिचिताचे दिल्लीत कामाला तरुणपणातील दिवस आठवत होते आम्ही दोघेही एकदमच दिल्लीत आलो होतो त्यावेळी माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता *संजय खूप पैसे कमविशील इतकं तुझं शिक्षण झालं नक्कीच आहे मात्र किती आणि कसे ते मात्र तू ठरव,,,,* मी अगदी त्याच रस्त्यावर नेटाने चालायचा प्रयत्न करत होतो आणि तो परिचित मात्र माझी टिंगल उडवत असे संजयजी तुम्ही गरिबी पाहिलेली नाही गरिबीचे चटके काय असतात तुम्हला माहीत नाही पैशाशिवाय पान हलत नाही पैसा भगवान नही ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......