एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,,
एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते
गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे
त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,,
एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,,
त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला
तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला
मजेत दिवस चालले होते,,,
एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो
पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,,
मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागला हळूहळू त्याने शंभर चे पाचशे रु केले पण तो मालक काही केल्या ऐकेना,,,
तसा तो बेपारी बसला एके ठिकाणी विचार करत,,, तो मालक ही गाढव घेऊन पुढे निघाला,,,
थोड्या वेळाने तो बेपारी पुन्हा गोड बोलून फसवायच्या उद्देशाने त्या मालकाच्या मागे आला,,,,
आणि बघतो तो काय,,,
त्या गाढवाच्या गळ्यात तो हिराच नव्हता,,,,
तसा मात्र तो गोड बोलणारा बेपारी चिडला अरे तो दगड काय केलास?? अस विचारू लागला ,,,
तसा तो मालक म्हणाला अरे बाबा आताच एक माणूस भेटला त्याने तो दहा हजार रु दिले आणि तो दगड घेऊन गेला,,,,
हे ऐकल्यावर तर तो बेपारी आणखी चिडला अरे मूर्ख माणसा तुला अक्कल आहे का तो लाख मोलाचा हिरा होता तू केवळ दहा हजार रु दिलास,,,😏😠?
तसा तो मालक म्हणाला साहेब,,,
मला तर त्या दगडाची किंमत कळत नव्हती
पण तुम्हला तर कळत होती ना????
मग फसल कोण????😏😏😠😠
तात्पर्य,,,,, गोष्ट इथे संपत नाही
गोष्ट तर खरी चालू होते,,,
आयुष्यातले असेच सारे मित्र नातेवाईक केवळ किंमत कळत नसल्याने आपण दूर लोटतो,, आणि ते गेले की त्यांची किंमत कळते परंतु वेळ निघून गेलेली असते
कुणी हुशार बेपारी तो हिरा कमी किमतीत आपल्या काखोटीला मारून निघून गेलेला असतो
ता. क.,,,,, आज या देशाच भविष्य असच आपण गमावून तर बसलो नाही ना
जब चिडीया चुग गयी खेत,,,,
Comments
Post a Comment