Skip to main content

Posts

Showing posts from May 3, 2020

एका चुकीची अनेकदा शिक्षा भोगावीच लागणार*

*सध्या वारंवार बाळासाहेबांचे त्यांच्या जुन्या व्हिडिओचे शिवसेनेचे उमाळे येणाऱ्यांसाठी खास,,,* ठाम मत द्विधा मनस्थिती असणारे कायम शिक्षा भोगत राहतात,,,, एकदा एका राजाने त्याच्या राज्यातील एका माणसाला काही कारणास्तव 100 चाबकांच्या फटाक्यांची शिक्षा सुनावली,,,, झाला शिक्षा देणारा चाबूक नाचवत आला,, तसा चाबकाचे फटके खाल्यावर आपली परिस्थिती काय होणार याच चित्र डोळ्यासमोर नाचू लागल्या बरोबर तो माणूस ओरडला,,, *दया करा महाराज दया करा महाराज,,* अहो जीव जाईल हो माझा माझी ताकद नाही 100 फटके खायची,,, तसा राजा म्हणाला बर बर अस कर 100 कांदे खा,,, माणसाने विचार केला 100 चाबकाचे फटके खाण्या पेक्षा हे बर आहे,,, त्याच्या समोर कांदे ठेवले,, 1,2,3,4 कसे बसे कांदे खाल्ले पण लक्षात आलं हे काही खर नाही चाबकाचे फटके कसेही ही सहन होतील,,, पण जिभेची लाही लाही सहन होत नाही,,, तसा तो पुन्हा ओरडला महाराज हे कांदे काही सहन होत नाही तुम्ही मला फटकेच द्या,,,, आता फटके सुरू झाले 4/5फटके कसे बसे खाल्ले पण चामडीत रुतणारा तो चाबूक सहन होईना,, तसा तो पुन्हा ओरडला *महाराज दया करा,,,* मला पुन्हा कांदे खायला द...