पूर्वी जेव्हा आमचं गाव हे गाव होत त्यावेळची आठवण,,, शेती वाडी गाई गुरू म्हैस गाढव कोंबड्या बकरे हे जवळपास प्रत्येक घरात पाळीव असतच,, त्यामुळे अशा समृद्ध घरात गाई गुरू म्हशी यांच्या चोऱ्याचं प्रमाण ही जास्त असे,,,, परंतु बरेचदा चोर चोरी करताना पकडला जात असे मग काय,, दे दना दन,,, असा कार्यक्रम ठरलेला असे,, पण चोर हा कायम तुमच्या हुशारीच्या चार पावलं पुढे असतो,,, हळू हळू चोरांनी चोरीची पद्धत बदलली एकटे दुकटे येणारे चोर आता हळू हळू,, टोळक्या टोळक्याने येऊ लागले मग ते ही जनावर चोरताना आधी ते #गळ्यातील_घंटा काढू लागले मग त्या चोरां पैकी एक जण ती घंटा घेऊन निघून जात असे #मालकाची_दिशाभूल_करण्यासाठी आणि उरलेले विरुद्ध दिशेने,,,, अर्थातच मालक मग घंटेचा आवाजाचा मागोवा घेत पकडायला धावत असे पण काही अंतरावर तो चोर ती घंटा कुठे तरी आडोशाला टाकून निघून जात असे आणि इकडे ज्यांच्या हाती ते चोरलेलं जनावर गाय, म्हैस जे असेल ते शांत पणे घेऊन जात असे मधल्या मध्ये #मालक मात्र मस्त #फसत असे #हिंदूंच्या गाई म्हशी:-- राम मंदिर, 370, कश्मीर,पाकिस्तान, भ्रष्टाचार, आरक्षण, या सारखी हिंदू हिताच...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......