मध्ये एकदा
सध्या राष्ट्रकुलचे पडघम वाजून बंद होण्याच्या मार्गवर आहेत. नव्हे ते होतीलच यात शंका नाही.
चौकशी समितीचे फार्स बसतील,दावे प्रति दावे होतील .
टिशू पेपर म्हणे १०००० चा होता यावर मी पामर काय बोलणार?
आणि कॉंग्रेसचा आदर्शवाद काय,
महाबळेश्वरची जमीन घोटाळा काय ,
अशोकाचे झाड काय , नारायण राणे काय ,विलासराव काय आणि
सर्वांचे मुकुट शिरोमणी ,श्री शरदचंद्र पवार काय वाह क्या बात है,
यांचे भ्रष्ट पायावर बांधलेले कायदेशीर ईमले
सारे एकसे बढकर एक,,त्यांचे बिल्डर पूजन सुरस कथा तरी सांगायच्या
प्रबोधनकारांची गोष्ट वाचनात आली ,
आपणा पैकी कित्येकांना माहित हि असेल कदाचित,
असो तर गोष्ट अशी ,,,
केशव सीताराम ठकारे ,म्हणजेच प्रबोधनकार ,
त्यांच्या तरुण पणी त्यांनी एकदा लॉटरीच एक तिकीट काढल.
आणि कर्मधर्म संयोगाने ते लागल हि ,,,
गावात बातमी पसरली अरे ठाकरेंना लॉटरी लागली.
जो तो ठाकरेंच अभिनंदन करत होता
कारण मिळालेली रक्कम हि खूप मोठी होती
आज कदाचित ती तुम्हाला कमी वाटेल
कारण आज आपणा सर्वांची मुल त्या लॉट्रीच्या
रकमे ईतका पैसा रोज खर्च करतात.
तर ती रक्कम होती.
एक रुपयाच्या बदल्यात ७५ रुपये
हसलात ना..?
पण त्याकाळी ७५ रुपयात
किमान ६ महिने एखाद्या कुटुंबाचा घराचा खर्च चाले ,,,,,,
तर असे ते ७५ रुपये कधी एकदा आईच्या पायावर ठेवून
तिची शाबासकी मिळवतो असे ,
प्रबोधनकारांना झाले होते ,आणि हि बातमी तो पर्यंत
त्यांच्या आईला हि कळली होती ,
मुलाची वाट पाहत ती दरवाजात बसली होती ,
आणि धावत धावत केशव आला
आईची पायावर ते पैसे ठेवणार ,,
तोच एखादी वीज कडाडावी तशी ती माउली
कडाडली आधी ते सारे पैसे घराच्या बाहेर टाक..........
एक रुपयाच्या बदली ७५ रुपये म्हणजे
७४ जणांचे तळतळाट घरात आणण्या सारखे आहे
तेव्हा ते सारे पैसे आधी बाहेर फेक आणि
आणायचाच असेल तर आपला रुपया तेव्हडा घरात आण
तर घरात ये.....
लक्षात घ्या जर ७४ रुपयांचे तळतळाट त्या माउलीला भारी वाटले
की बाबा नको ते पैसे आपल्या घरात जर ७४ जणाचे तळतळाट
नको मग या सर्व नेत्यांच्या घरी किती जनांचे तळतळाट
जात असतील,,,,,,,,,,?
तात्पर्य-
असे संस्कार देणारी आई परत महाराष्ट्रात नाही झाली नाही
म्हणून तर
नार्या,चव्हाण,पवार,कलमाडी सारखी औलाद जन्माला आली.सध्या राष्ट्रकुलचे पडघम वाजून बंद होण्याच्या मार्गवर आहेत. नव्हे ते होतीलच यात शंका नाही.
चौकशी समितीचे फार्स बसतील,दावे प्रति दावे होतील .
टिशू पेपर म्हणे १०००० चा होता यावर मी पामर काय बोलणार?
आणि कॉंग्रेसचा आदर्शवाद काय,
महाबळेश्वरची जमीन घोटाळा काय ,
अशोकाचे झाड काय , नारायण राणे काय ,विलासराव काय आणि
सर्वांचे मुकुट शिरोमणी ,श्री शरदचंद्र पवार काय वाह क्या बात है,
यांचे भ्रष्ट पायावर बांधलेले कायदेशीर ईमले
सारे एकसे बढकर एक,,त्यांचे बिल्डर पूजन सुरस कथा तरी सांगायच्या
सिंदबादच्या सफारी,हातिमताई ,चांदोबा,वेताळ पंचविशी,
पंच तंत्र ,अकबर बिरबल सारे यांच्या बुद्धीमत्ते पुढे फिके आहेत
Comments
Post a Comment