महाभारत युद्धात अभिमन्यू चक्रव्यूह भेदताना दिसणार आहे,, हे सगळं आठवायचं कारण आमच्या घरातलं *जुन घड्याळ,,,* मी साधारण 11 वीत होतो त्यावेळी ते घड्याळ थोडं बिघडलं होत किती ही चावी दिली काटे उलट सुलट फिरवलं तरी ते कधी मागे कधी पुढे पळत असे योग्य वेळच दाखवत नसत एक दोन जणांना ते दाखवलं पण त्यांनी सांगितलं आम्ही बनवत नाही ,,, एक दिवस मात्र घरात कुणी नाही हे बघत माझ्यातला मॅकेनिक जागा झाला ,,म्हंटल बघू तरी काय ते खोलून,,, पण ते खोल्ल मात्र नेमका काय बिघाड तो लक्षात येईना,, शेवटी नाद सोडला ,, पण खरी अडचण तर पुढे होती ,, ते घड्याळ उघडायला तर उघडलं पण आता ते पुन्हा फिटिंग करणं अवघड होतं त्यात बापाचे फटके बसणार ते वेगळंच होत,,,, घाबरत घाबरत मी ते कसबस फिट करत होत तस भिंतीवर लटकवल,, थोड्या वेळाने वडील आले त्यांनी ते घड्याळ एका चांगल्या हुशार घड्याळवाल्याकडे नेलं त्याला सांगितलं की चालताय पण सारख पुढे मागे होतय,,
अर्थातच ते घड्याळ त्याने उघडलं आणि वडिलांना सांगितलं अहो तुम्ही म्हणताय की घड्याळ चालू आहे पुढे मागे होतंय,, वडील म्हणाले हो,,
त्यावर ते घड्याळ माझ्या वडिलांना दाखवत म्हणाला अहो हे पुढे मागे तर सोडा काहीही चालणार नाही हे बघा याचा एकही पार्ट त्या जागी नाही यातले बरेचसे पार्ट यात नाहीत देखील असंही हे घड्याळ आता जास्त रिपेर होत नाही त्यात तुम्ही पार खोलून आणलेत,,
वडील त्याला काहीच बोलले नाहीत गुपचूप ते घड्याळ ते घरी घेऊन आले त्यांनतर ते *घड्याळ जे अडगळीत पडलं ते पडलं*,,,,
त्यावर त्यांनी मला जो दम रुपी प्रसाद द्यायचा तो अर्थातच दिला *अर्धवटराव ठरवला गेलो*,,,
सध्या लोकडाऊन आणि महाभारत बघताना म्हणूनच ती अभिमन्यूची गोष्ट आठवली,,,,
महाभारत काळात अभिमन्यू देखील अर्धवट माहितीच्या आधारे युद्धात मारला गेला कारण *चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्गच माहिती नव्हता*,,,
आज सुद्धा बऱ्याचअभिमन्यूनना लॉक डाऊन तोडायचा आहे जरूर तोडावा पण यातुन सुटकेचा मार्ग माहिती आहे का??
ते तुम्ही ठरवा
निदान जो पर्यंत उपायांचा मार्ग कळत तो पर्यंत कितीही अप्रिय वाटला तरी *लॉक डाऊन तर हवाच आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
Comments
Post a Comment