Skip to main content

पोपट मुका झालाय (मेलाय ),,,

एकदा एक राजा नेहमी प्रमाणे शिकारीला जंगलात गेला असता नेहमी प्रमाणे सैन्याची आणि त्याची चुकामूक झाली,,,
नेहमी प्रमाणे मग जंगलातील आदिवासींनी राजाला पकडून नेलं,,, पुढे त्यांच्यात देवीला राजाचा बळी द्यायचा त्यासाठी योग्य वेळ मुहूर्त पाहून दुसऱ्याच दिवशी सक्काळी सक्काळी सूर्य उगवतात देवीला बळी द्यायचं ठरलं,, त्यासाठी राजाला वधस्तंभावर दोरखंडाने बांधण्यात आल,,,
परन्तु बळी चा मुहूर्त पाहणाऱ्या पेक्षा राजाचं नशीब जोरावर होत,,
उद्याच्या मरणाची वाट पाहणारा राजा असहाय होत वर देवा कडे पहात होता संध्याकाळ झाली रात्र झाली आणि अचानक कुठूनसा एक पोपट उडत उडत तिथे आला त्याने राजाला त्या अवस्थेत पाहिलं आणि हळू हळू तो त्या दोरखंडाच्या गाठी सोडवू लागला, राजाला तर देवच पावला होता थोड्याच वेळात
राजा त्या दोरखंडातुन मुक्त झाला राजाला खूप आंनद झाला तत्क्षणी राजाने त्या पोपटाला सोबत घेत आपल्या राज्याकडे निघाला इकडे पहाट झाली होती आदिवासी जागे होत पहातात तो काय राजा गायब झाला होता,,,
इकडून आदिवासी तिकडून राजाचे सैनिक देखील तो पर्यंत शोधायला बाहेर पडले होते सुदैवाने तो पर्यंत राजा आपल्या सैनिकांसह राज्यात पोहचला होता मोठ्ठं संकट टळलं होत,,,
*हे त्या पोपटा मुळे आपण बचावलो हे त्या चाणाक्ष राजाच्या लक्षात आलं*,,,,
मग काय पोपट म्हणजे राजाचा जीव की प्राण झाला सतत राजा सोबत फिरायचा देश विदेशच्या भाषा बोलायचा आज ह्या राजा उद्या त्या राजाला भेट ,,राजाच्या प्रत्येक गोष्टीला त्याच समर्थन असे , राजाच्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याच स्वतःच मत ( त्याच्या योग्य) असे,,
राजाच्या राज कारभारातल त्याला सगळंच कळत असे,
असा तो पोपट राजसैनिक त्याची खूपच बडदास्त ठेवत त्याला हवं नको ते बघणं त्याचा दिवसाला 40 वेळा रोज वेगवेगळा खुराक देत असत तो जेवला की नाही हे कळल्या शिवाय राजा देखील जेवत नसे त्याच्या सरबराईत कमी पडेल त्याला तुरुंगाची हवा खावी लागे किंवा थेट फाशी मुंडकच मारलं जात असे,,
*असा तो पोपट एक दिवस अचानक मेला*,,,, सगळ्यांची पाचावर धारण बसली की आता राजाला हे सांगायचं कस आणि जबाबदारी तरी कुणी घ्यायची???? मोठ्ठा बाका प्रसंग ओढवला होता,,,,,
शिपाई मंत्र्याला , मंत्री प्रधानला, सारे मोठे गायक भाट,,, *कुणीच हे राजाला सांगायची जबाबदारी घ्यायला तयार नव्हत की पोपट मेलाय,,,*
हा सगळा गोंधळ तो पर्यंत सेनापती कडे पोहचला ,,,
सेनापती हुशार होता मूर्खांशी कस बोलायचं त्याला माहिती होत तो आला त्याने पाहिलं ,,,
त्याने प्रधानाला विचारलं *काय झालं हा पोपट तर फक्त गप्प बसलाय ना? आज उपवास असेल म्हणून तो काही खात पीत नाही,त्यात त्याच मौनव्रत देखील असेल*,,, हे ऐकल्यावर प्रधान आश्चर्यचकित होत थोड्या रागाने म्हणाला तुम्हला सेनापती कुणी बनवलं हो,??
अहो सेनापती तो पोपट मेलाय एव्हड देखील कळत नाही का😠?
*तेव्हा सेनापती म्हणाला मी अस कुठे म्हणालो की पोपट मेलाय तुम्हीच म्हणताय*😜😊,,, आता राजाला तुम्ही हेच सांगायचं,,
प्रधानही हुशार होता त्याच्या लक्षात आलं की राजाला काय कसा निरोप द्यायचा,,,
झालं ठरल्याप्रमाणे प्रधान राजा कडे गेला गेल्या बरोबर
*राजाने विचारलं काय प्रधानजी काय म्हणतात आमचे पोपटराव*?
अर्थातच सेनापती ने पंढवल्या प्रमाणे प्रधानाने सांगितलं वर आणखी मसाला लावत सांगितलं तुम्हीच चला व पहा रुसलेल्या पोपट रावांची तुम्ही समजूत काढा ,,,,ते काहीच बोलत नाहीत जेवायला तयार नाहीत,,,
*राजाने एकंदर सारा प्रकार बघितला आणि पटकन बोलला अरे गाढवांनो हा तर मेलाय*,,

राजाचे हे उदगार ऐकून सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला,,,,,,

तात्पर्य:-,,,,
आज देखील राजाचा पोपट निकाल लागल्या पासून गप्प झालाय देखील ( मेलाय)
पण राजला हे समजलं तर ठीक पोपट म्हणजे आपलं लादलेल मत जनतेच्या माथी गळी उरतवण्यासाठी ठेवलेला तज्ञ नव्हे हे राजाला कळलं तर बरं,,,
कुणीही जंगलातून सुटका होऊन आपल्या राज्यात केवळ पोपटाच्या मदतीने आला म्हणजे पोपट सर्व विषयातला तज्ञ आणी त्याच्या भरवशावर राज्य नाही करता येत (टिकवून ठेवता येत नाही) हे राजांच्या लक्षात आलं तर बरं

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...