Skip to main content

आईचा मंत्र, मी आणि भाजपची सत्ता लालसा,,,



परवा नेहमी प्रमाणे fb वरची कुस्ती खेळत होतो तोच तिथे माझे मामा आले आणि म्हणाले *कुणीही आपली सत्ता आपला पक्ष वाढणारच फायदा बघणारच,,,*
आणि मला नेमक्या दोन घटना नेमक्या काल आठवल्या,,,
एक तर लहानपणी आईने दिलेला मंत्र आणि दुसरा हॉस्पिटल मध्ये असलेला माझा मित्र,,,,
लहानपणी लक्ष सार खेळण्याकडे असे आणि मग गडबडीत जेवण खान वैगेरे चालत असे त्यात *आई जे बनवेल ते भारीच असे आणि ते मग भर भर भरायचं तोबरा भरल्या सारख, पण आवडीचं म्हणून तोबारा भरायचा नसतो तो चावता ही येत नाही आणि गिळता ही येत नाही गिळला तर ठसका लागणं उलटी होणं किवा मग हळू हळू पाणी पीत तो घास कसा बसा गिळण,,*
*परन्तु असा गिळलेला घास त्याची ना चव घेता येत असे नाही तो अंगी लागत असे*
त्यावेळी आईने तो आईने दिलेला मंत्र मी आजही विसरलेलो नाही
*आई म्हणायची आवडलं म्हणून तोबारा भरू नकोस हळू हळू तोंड स्वीकारेल इतकंच खा तोंड म्हणजे पोट नाही जे भरून ठेवशील आणि पोटाची ताकद तेव्हडीच आहे जेव्हड तोंड स्विकार करेल या उलट वागशील तर अपचन हे ठरलेलं,,,*
आजही तो जेवायचा नियम सगळीकडे लागू होतो आणि त्यामुळे*मी व्यवसाय करतो धंदा करत नाही*,,
उगाचच मिळतोय पैसा मिळतंय काम आहे वेळ जमतंय ना मग करू दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस आज नाही कमवणार तर कधी कमवणार अस कधीच करत नाही असली कारण देत मी कधीच पैश्या मागे धावत नाही,,,
असो तर सांगायचं अस की
माझ्याच वयाचा माझा मित्र परवा त्याला दिवाळी साठी फोन केला तर कळलं की अमुक अमुक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय,,,
मी लगोलग त्याला भेटायला गेलो,,,
विचारपूस औषधपाणी केली औषध वैगेरे नीट घे काही लागलं तर कळव रे मी आहे मुंबईतच राहतो कुठे अमेरिकेत नाही असं थोडं रागावून च बोललो आणि निघणार तोच त्याने माझा हात धरला आणि डोळ्यात पाणी आणून बोलू लागला,,,
सुनील, तू नेहमी बोलत असायचा की थोडी धावपळ कमी कर आणि मी म्हणायचो अरे आज नाही तर कधी धावणार रे,,?
आताशी कुठे 50 शी पार केलीय अजून किमान 5/6 वर्ष तरी धावायचं मग बघू नन्तर रिटायर्ड तर नोकरी करणारे होतात धंदा करणारे थोडेच होतात? असा मी नेहमी युक्तिवाद करत असे
पण आता डॉ ने काय सांगितलं माहिती आहे? असं थोडं गंभीर होत तो बोलू लागला,,, *ट्रेस* अतिरिक्त धावपळ मर्यादे पलीकडे फक्त धावाधाव ओढाताण आता शरीरावरच नव्हे तर मनावर सुद्धा आलाय रे डॉ म्हणाले मनावर ताण बरा नाही हार्टअटॅक बायपास देखील होऊ शकतो तेव्हा आता थांबा आता बास आता थांबा,,,,,,
माझ्याच सोबत 55च्या उंबरठ्यावर उभा असलेला मित्र डोळ्यात माझं न ऐकल्याचा भाव आणत बोलत होता,, तुझं ऐकलं असत तर आज ही सारी कमाई डॉ च्या कामी आली नसती,,,,
मी काही बोलणार तोच सावरलं आणि डोळ्यांनीच त्याला समजावले दे सोडून आता कळलं ना आता थांब,,
मी आहेच सोबत,, अस म्हणून निघालो,,

*हे सारं आठवलं ते आमच्या मामांनी fb वर भाजपच्या चुकीच्या धोरणाची जेव्हा त्यांनी केविलवांनी भलामण केली*
मामा साहजिक आहे सत्तेत आल्यावर कुणीही आपली *ताकद* वाढवायचा प्रयत्न हा करणारच
परन्तु *बाळस धरण आणि सूज येणं* यातला फरक निदान मी तुम्हला तरी सांगायला नको हो ना?,,,
भाजपची जी कोंडी होऊन बसलीय ती तिने अवलंबलेल्या राजकीय चालीचा परिपकच आहे काँग्रेसमुक्त देश करायचा खूप मोठा चान्स भाजपने घालवला वर त्यांना नवं संजीवनी दिली 
या निवडणुकीत त्यांना झोपवायचा मोठा चान्स असताना भाजपा नेतृत्वाला घाई इतकी होती की एकतर आमच्या त सामील व्हा नाही तर टाकतो तुरुंगात अशी धमकी देत साऱ्या काँग्रेसीनना आपल्यात सामावून घेतले वाटलं की *आपली ताकद वाढेल आज नाही तर मग कधी अस म्हणत पण ती ताकद नव्हती तर सूज होती*
हे ते आजही मान्य करायला तयार नाहीत त्यातून मित्रपक्ष
म्हणजे आपला जानीदुष्मन ही मनात भावना
मग काय *ये तो होना ही था* सत्तेच्या मार्गात ( गळ्यात हाडुक अशी अवस्था) खाता येत नाही गिळता ही येत नाही अशी अवस्था फक्त तेव्हाच होते तात्पर्य:-
जेव्हा हावऱ्यासारखं मिळतंय म्हणून तोबारा भरायचं प्रयत्न केला की होते तेच आज भाजपा च झालाय पण हे ना भाजप नेतृत्वला समजत ना ही त्याच्या (भक्तांना ) पाठीराखे समजून घ्यायला तयार आहेत जर 2014लाच सेना आपली मित्र म्हणून सत्तेत सोबत आपण घेतली हे मानलं असत तर कालची दिवाळी मिळालेल्या 30 मिनिटात साजरी झाली असती 
आता फक्त एकच
*समज जावं सुधर जावं*
तुला न मला घाल कुत्र्याला असच होईल
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...