घर आमचं माळकरी त्यामुळे पूर्वी ग्रंथवाचन वारी ह्या सामान्य गोष्टी होत्या(आताशा अवघड वाटू लागल्यात ) त्यामुळे रामायण महाभारत हे ही रोजच्याच कथा मग हळूहळू शाळेत देखील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खास पुस्तक मुलांना वाचायला देत असत काही शिक्षक मग कधी कधी त्यावर प्रश्न ही विचारत ,,
अशी ती ऐकण्याची वाचनाची गोडी लागलेला मी त्या ग्रंथ वाचनात हमखास कर्णाची गोष्ट येत असे,,
इतकंच कळायचं की तो दुष्ट लोकांसोबत आहे आणि विजय पांडवांचाच होणार,, हे गणित ग्रंथ संपायच्या आधीच डोक्यात फिट्ट झालेलं असायचं,
पण,,,,
मनात मात्र कायम एक हुरहूर असायची
जळो मेल ते युद्ध वैगेरे,, पांडव भले ही युद्ध जिंकोत पण कर्ण मात्र हरयला नको,,,
कारण हळू हळू राधेय वैगेरे सारखी पुस्तक वाचनात येऊ लागली होती पण तरीही तो शत्रू सोबत लढतो हे मात्र मनात ठसलेलं असून ही तो हरू नये हे मनाने ठरवलेलं असायचं,,
मग एक दिवस माझे आजोबा आईचे वडील ,,
पुण्याला गावी गेलो असताना त्यांना मनातला प्रश्न विचारला,, की अस का ? मीच नव्हे माझे बरेच समवयस्क मित्र देखील असच म्हणतात की कर्ण जिंकायला हवा,,, अस नक्की खरच होत का??
*त्यावेळी आजोबा म्हणाले हो कर्ण चांगलाच होता
इतका की नीती , चारित्र्य, शब्द,वचन, सत्य,दानशूर हे सारे शब्द इतिहासात फक्त त्यांच्यासाठीच बनले असावेत,,,,,,*
म्हणजे झालं अस की त्याबाबतची एक गोष्टच त्यांनी मला सांगितली,,,
महाभरताच युद्ध सुरू झालेलं असत आज युद्धाच सेनापती पद हे कर्ण कडे असते आणि सगळ्यांना माहिती असत ,, अगदी भगवान श्री कृष्ण देखील जाणून असतात की अर्जुनाला जर कुणी मारू शकतो तर तो केवळ कर्ण,,,
आणि एक कुशल सारथी काय करू शकतो ते श्रीकृष्ण त्या युद्धात करून दाखवतात जेव्हा जेव्हा कर्ण अर्जुन भिडणार तेव्हा तेव्हा मोठ्या शिताफीने
रथ वळवत असे पण एक वेळ अशी आली की कर्ण आणि अर्जुन सामोरा समोर आलेच,,
आणि कर्नाच्या धनुष्यातून बाण सुटलाच पण सावध असलेल्या श्रीकृष्णांनी आपला रथ दोन बोट खाली जमिनीत दाबला,, बाण अर्जुनाच्या मुकुटला उडवून गेला अर्जुन वाचला,,, पण इथेच मोठी गम्मत झाली तो बाण फिरून पुन्हा कर्नाकडे आला
कर्ण चपापला हे कस शक्य??
त्यावेळी त्या बाणावर आरूढ अश्वसेन नाग तो हात जोडून उभा होता,,,
कर्नाने त्याला विचारलं तू कोण त्यावेळी त्या अश्वसेनाने त्याची गोष्ट सांगितली अर्जुनाने जे खांडव वन जाळले त्यात माझे आई वडील तक्षक सारे कुटुंबीय नाहक मारले गेले , त्यामुळे या अर्जुनाचा जीव घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले परन्तु अर्जुनला एक तुम्हीच मारू शकता हे मी जाणून होतो
आणि म्हणूनच मी तुमच्या बाणावर आरूढ झालो यावेळी थोडी रथ अचानक दाबल्यामुळे माझा अंदाज चुकला पण परत पुन्हा तुमच्या बाणा वर आरूढ व्हायची परवानगी द्या यावेळी मी चुकणार नाही अर्जुनाचा जीव घेतल्याशिवाय परत येणार नाही,,,
*त्यावेळी कर्ण त्या तक्षकाला हात जोडत बोलला नागराज तुमचा राग मी समजू शकतो परन्तु माझ्या युद्धशास्त्रात नितीमत्तेत हे बसत नाही त्यामुळे तू आधी माझी परवानगी न घेता बाणावर गेलास ठीक माफ केलं पण आता जाणून बुजून मात्र अर्जुन माझा किती मोठा शत्रू असला तरीही मी तुझा पुन्हा वापर करणार नाही त्यावेळी तक्षकाने कर्नाला आशीर्वाद दिला कर्ना जा या युद्धात जरी तुझा पराभव झाला तरी तू या महाभारताचा खलनायक नक्कीच नसशील*
इतकं बोलून आजोबा थांबले
*मला जवळ घेतलं आणि त्यांनी सांगितलं सुनील
अंगाला लागलेला मळ जसा आंघोळीनं दूर होतो तसा मनाला नितीमत्तेला चारित्र्याला लागलेला मळ हरिकथा वाचून त्याप्रमाणे वागून दूर होत असतो*
त्यावेळी इतकं जड जड ऐकायची समजायची समज नव्हती तशी ती आजही नाहीच नाही
पण नीतिमत्ता सोडून वागू नये इतकं मात्र नक्की लक्षात राहील मग भले आपलं नुकसान झालं तरी चालेल
आजचे राज्यकर्ते यातून धडा घेतील काय??

Comments
Post a Comment