Skip to main content


टोट्टा पटाखा आयटम माल’ : पुरुषांनाही बलात्काराची भीती वाटली पाहिजे? नक्की वाटेल?? 8च्या आत घरात ही बंधन पुरुषांना देखील पाळावीशी वाटायला हवीत,,
हा विचार घेऊन हा नेटफ्लिक्स वरचा सिनेमा पहायला मिळाला,,,,,


एक सिनेमा. नावावरून काहीच अर्थ लागेना. म्हटलं जरा डोकावून पाहूया. नाव होतं- टोट्टा पटाखा आयटम माल. आणि मी हादरलो

हा सिनेमा होता चौघींचा. चारचौघींसारख्या त्या चौघी. शहरी, निमशहरी कुठेही या चौघी सापडतील अशाच. पुरुषी क्रूरतेला बळी पडलेल्या. 

दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडानं खजील झालेल्या. 
पुरुषी ताकदीवर अनेक बलात्कार घडतात, पण लहानपणापासून स्त्री ही अशक्त, कमजोर, लाचार असण्याची भावना ठासून उरी बाळगणाऱ्या चौघी कुठेतरी आत धुमसत असतात.,,,
त्या पेटून उठतात, *जेव्हा एक धडधाकट, अतिशय माजोरडा साडेसहा फूट उंचीचा तरुण त्यांची छेड काढतो.*
सुरुवातीला दुर्लक्ष्य करण्याचा पवित्रा घेणाऱ्या या चौधी शेवटी त्याला धडा शिकवण्याचे ठरवतात.

कणखर वृत्तीची कराटे टीचर *चित्रा* त्याला झुंज देते, तरी नाजूक स्त्री शरीर आणि माजलेला सांड, या दोघांत जुंपत नेहमीसारखा पुरुष हावी होतो,,,,
तेव्हा रात्री स्त्रियांसाठी टॅक्सीचा उद्योग करणारी *शैला* चिली स्प्रेनं वार करते. 
तिसरी स्त्री हरयाणा महिला पोलीस असते. ती आपल्या काठीनं वार करते. पुरुष कोसळतो. आपण त्याचा खून केला असं वाटून चौथी त्याला टॅक्सीत घालून पुढे जायचं ठरवते, पण तो जिवंत असतो. पुन्हा चिली स्प्रेचा मारा करत त्याला काबूत आणण्याचे प्रयत्न केले जातात.

एका बंद पडलेल्या ऑफिसच्या कपाटात त्याला बंद केलं जातं. पण आपण याला इथं डांबून नेमकं काय साधणार आहोत, या तिघींच्या प्रश्नाचं उत्तर देताना चौथी स्त्री *विभा* - जी फेसबुक मीडिया एक्स्पर्ट असते - एक योजना आखते. तिच्या मते आज स्त्रिया रात्री आठनंतर घराबाहेर पडायला का धजत नाहीत, निर्भया कांडनंतर अनेक मायबाप मुलींना दिल्लीत पाठवायला धास्तावलेत. स्त्रिया\मुलींचं मनोबल खचलं आहे, तर तिकडे पुरुष देखादेखी अनेक कांड करतात. स्वतःच्या प्रेयसीच्या क्लिप दाखवताना त्यांना जराही नैतिकतेचं भान वाटत नसून ती त्यांचा इगो सुखावणारी, *मित्रांसोबत मजा लुटवणारी बाब वाटते. त्यांना धास्ती राहिली नाही. कांड केल्यानंतर समाज, कायदा आपल्याला ठेचून काढेल ही भीती वाटत नाही*. 
अन्यथा निर्भयावर पाशवी अत्याचार करणारा क्रूर इसम हा शरीरानं सर्वांत कृश, अशक्त व्यक्ती होता. ,,,,,
जर पुरुषी मनोवृत्तीच ढासळली तर त्याच्या शरीरावर काबू करता येऊ शकेल. ‘पुरुषांचा गॅंगरेप’सारख्या घटना पुढे आल्या तर नक्कीच त्यांचं मनोबल खचेल, पण सहजी मानेल तो अत्याचारी पुरुष कसला? आणि मग तयारी होते एका थीमलाईनवर काम करण्याची- *पुरुषांना देखील बलात्काराची भीती वाटली पाहिजे*,,,,
*रेप करण्यामागची पुरुषी मानसिकता काय असते, स्त्रियांना घाणेरड्या भाषेत, अंगविक्षेप करून त्यांना काय सुख लाभतं, उपभोग्य वस्तू समजणारे पुरुष स्वत: कधी खचू शकतात का?*
*एकूण या थीमलाईनवर काम करण्यासाठी एक व्हिडिओ शूट करताना चौघींना बलात्कार करावा लागला का? रेप आणि मारहाण होण्याची भीती कितपत घर करू शकते, त्याचा मानसिकतेवर काय आघात होतो, हा या सिनेमाचा आत्मा.*

*पण गँग रेप तो ही बायकांकडून??? कस शक्य आहे ???*
एखाद्या गँगरेपनं घाबरणारा, काठोकाठ पुरुषी माज असलेला, संवेदनशीलता, सोशिकता हरवलेल्या समाजातला पुरुष (यात फक्त तरुणच नाही तर कुठल्याही वयातला पुरुष) हा सहजी याला बळी पडणार नाही, असं वाटत राहतं.

ही लढाई खूप मोठी आहे, पण कुठेतरी या विषयाला प्रतिरोधात्मक मार्ग शोधायला हवेतच, पण तरी हा मार्ग सुकर वाटत नाही. कारण जेव्हा त्या एका पुरुषावर चार स्त्रिया रेप करणार असं स्पष्ट होताना दिसतं, तेव्हा तो पुरुष आणखी सुखावतो, खुश होतो. उलट तोच आवाहन करतो अरे तुम्ही मला आधीच सांगायचं ना मी तर तयारच होतो😏😏
मग आता काय आणि कसं होणार हा मूळ प्रश्न सतावत राहतो
आणि सुरवात होते शूटिंगला,,,
समाज माध्यमाचा पुरेपूर वापर करत जसे पुरुष mms बनवून व्हायरल करायची धमकी देतात ह्या स्त्रिया ह्याच गोष्टीचा फायदा घेतात
आणि सूर होते चौघींची लढाई ,,,
आधी रीतसर त्या त्याच मानसिक खच्चीकरण करायला सुरुवात करतात,,
मग पुरुष जी जी अपेक्षा धरतो स्त्री कडून त्या पुरुषी अहंकाराचा वापर केला जातो,,
पैर की जुती समजणाऱ्या या सांडाला मग स्त्रिया सांगतील तसच वागावं लागत
आणि मग येतो शेवटचा डाव
ठरल्या प्रमाणे एक सेकंद आधी संपणारा,,,,
आणि अर्थातच समाज माध्यमात तो व्हायरल व्हिडियो पाहून *बदनामीला भिऊन तो पुरुष* जीव देतो,,, आणि सिनेमा संपतो
पण या दोन तासात जो थरार दाखवायचा होता तो दिगदर्शकाने बरोबर दाखवला आहे थोडा इकडे तिकडे रेंगाळतो काहीसा पटत ही नाही,, पण सिनेमाची थीम लाईनच जबरदस्त आहे
*स्त्रियां प्रमाणे भीती ही पुरुषांना देखील वाटली पाहिजे आणि ती वाटण्यासाठी आता स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे आपलं न्यायखात तर वर्षोनुवर्षे फायलींच्या खाली धूळ खात दबल गेलंय त्याला वेळ नाही न्याय द्यायला आणि सरकारकडे इच्छाशक्ती,,😏😡😡*

या सिनेमातली आणखी एक गोष्ट नोंदवण्यासारखी आहे. ती म्हणजे यात एक फेमिनिस्ट म्हणून मिरवणारी स्त्री ही सगळ्यात जास्त या थीमच्या विरोधात असते. तिच्या मते असं करणं अत्यंत चूक आहे, पण बळी पडलेल्या तिन्ही स्त्रिया एकमतानं तिला खोडून लावतात. तेव्हा सहज लक्षात येतं, *आजवर बळी पडलेल्या अनेक स्त्रिया आणि फेमिनिस्ट म्हणवून घेणारे आपल्यातलेच अनेक नकळत ह्या गोष्टींना पाठिंबाच देत असतात*
तेव्हा
*ह्या पुरुषांना देखील भीती वाटावी अशी इच्छा असेल तर फक्त विचार करा देव न करो ह्या गोष्टीला चुकून आपणच बळी पडलो तर तेव्हा आपला विचार नेमका काय असेल???*


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...