Skip to main content

आई, लिंबूमिर्ची आणि हिंदुत्व

काल सहजच थोडा सक्काळी निवांत चहा पीत बसलो होतो नातवाने कार्टून लावलं होत ते पहात होतो एक लहान मुलं आईला विचारत होत मा क्या भगवान से डरणा चाहीये,,,आई, नही बेटा अपने गलीतीयोसे सिखोगे तो भगवान से डरने की कोई आवश्यकता नही,, *अगर निडर बनाना है तो गलतीयोसे डरणा भगवान तो तुम्हरा भला ही चाहते है*,,,,,
 तोच दारात एक लिंबू मिर्ची वाला आला, साब लगावू क्या,,, मी मानेनेच नकार देत त्याला पिटाळले,,,
 आणि अयोध्येतील प्रसंग आठवला,,,
 (उद्धव साहेबांनी आवाज दिल्यावर ) मी अयोध्येत गेलो होतो तेव्हाचा प्रसंग डोळयांसमोर आला अयोध्येचा कार्यक्रम आटोपून मी एका रिक्षात बसून निघालो थोडं दूर जातो नाही तोच सिग्नलवर एक लिंबूमिर्ची वाला आडवा आला तस त्या रिक्षा वाल्याने ती लिंबूमिर्ची घेतली,,लगेचच एक काली मातेचं रूप घेतलेली एक स्त्री अशी लालेलाल जीभ बाहेर नाचवत ती आडवी आली तस झटकन त्याने तिला पिटाळून लावली,,
मला आश्चर्य वाटून त्याला मी विचारलं,,
कारे बाबा जी भूत खेत दिसत नाहीत जी वाईट नजर दिसत नाही त्यासाठी तू लगेच लिंबूमिर्ची घेतलीस पण जी देवी स्वतः भुतांना मारू शकते तिला मात्र तू पिटाळून लावलस????
तेव्हा तो म्हणला साब ये झुटे है नकलची है इनसे क्या डरणा???
और वैसेभी मै इस मिर्ची मे लिंबू निचोड के खा सकता हू मेरा 10 रुपया गया तो भी कमसे कम 5 का फायदा तो है ना? इस नकलची को पैसे दे के क्या करू??? त्याच्या या युक्तिवादावर त्याच्या सोबत हसत हसत मार्गस्थ झालो,,
मात्र हे सार आठवताना,,,
आपसूकच ,
मोदींच हिंदुत्व, त्यांनी पप्पू काँग्रेसची भीती दाखवणे, निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम पाकिस्तानची भीती दाखवणे,कश्मीर मधील अल्पसंख्य हिंदूयांची होणारे हाल,,,वैगेरे वैगेरे
भाजप हिंदू मतदारांना दाखवत असलेली भीती डोळ्या समोरून नाचत गेली
आणि सहजच मनात तो रिक्षावाला डोकावून गेला
त्याने जस 10 रुपयांच्या लिंबूत 5 रुपयांचा फायदा बघितला असता
5 वर्षात आरक्षण 370 राममंदिर सारखे गेली अनेक वर्षे हिंदूंच्या अग्रक्रमावर असलेले प्रश्न जर हाती घेतले असते
अगदी केवळ राम मंदिराची फक्त एक वीट ठेवली असती तर किमान अजून पुढील 25 वर्ष तरी सत्तेततून पाय उतार व्हायची भीती भाजप सरकार ला पडली नसती
*हिंदू मतांच्या मनगटावर काँग्रेस मुस्लिम सारखे प्रश्न असे मिर्चीवर लिंबू पिळून खावेत तसे सहज खाल्ले असते*
पण भाजपच आज अस झालंय की
*हडळीला मिळत नव्हता नवरा आणि खैसाला मिळत नव्हती बायको* हिंदुत्व विसरल्यामुळे आज सारे प्रश्न डोळ्यासमोर पिंगा घालत आहेत बाकी काही नाही सुदैवाने पुढची पाच मिळतीलही पंतप्रधानपदी मोदी पुन्हा आरूढ होतीलही
पण परत पाहिले पाढे 55 अशी गत होऊ नये करू नये हा विश्वास त्यांना पुढील पाच वर्षात कमवावाच लागेल
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...