आज महाशिवरात्री आहे
सोमवारी आल्यामुळे त्याच महत्व अधिक,
भगवान शिव म्हणजे स्मशान जोगी, स्मशान म्हणजे सर्व काही संपले पण तिथली देवता म्हणजे शिव,,
आणि शिव म्हणजे कल्याण करणारी देवता चांगलं करणारी देवता,
आपल्या कडे यज्ञ करायची त्याला आहुती द्यायची परंपरा आहे या यज्ञात चांगल्याच वस्तू अर्पण करायच्या असतात चांगली वस्तू जाळली की त्याच होत #*भस्म*
भस्म हे पवित्र असते, हेच भस्म शिवाला देखील प्रिय असते, या सृष्टीत जे जे काही जळणार त्याची #*राख* होते, म्हणून आपले जीवन कार्य समाजातील वागणूक, नातेसंबंध, सामाजिक बंधिकली, जपत त्यानुसार सगळ्यांना आनन्द देत जीवन जगणं ही खरी #*शिवोपासना* त्यामुळे ह्या शरीराचे काम झाले की ते देखील अग्नीला अर्पण करायचे असते
त्याचे होते ते #*भस्म* पण आपण समाजात वावरतोच असे की त्याची #*राख* होते
मृत्यूचा ही उत्सव साजरा करणारी आपली परंपरा तेव्हा आपण ठरवायचं की आपली #*राख झाली पाहिजे की भस्म*
त्यामुळे संसारात राहून वैराग्य म्हणजे काय ते भगवान शिवां कडून शिकावं
प्रत्यक्ष ज्यांचं राहायचं स्थान कैलास ते सार त्यागून रमतात कुठे तर स्मशानात वैराग्य म्हणजे दारिद्र्यात राहणे अस बिलकुल नाही
घरात सगळं काही आहे परंतु त्यातून मन काढणं म्हणजे वैराग्य ज्याला महिनाभर उपाशी राहिला म्हणून उपवास घडला अस म्हणून चूक होईल तसच
वास्तविक सर्वच देवांना अमृत मिळावे म्हणून समुद्र मंथन केले होते राक्षसांनी सुरवातीलाच दारू घेतली
पण देवता मात्र अमृत येई पर्यंत कष्ट घेत राहिले परंतु जेव्हा त्यातून विष निघाले ते प्राशन केले ते फक्त भगवान शिवांनी
आज त्या निलकंठाचा उत्सव आहे
जगाच्या कल्याणासाठी भगवान शिव उपयोगी पडले, त्यांचा हा उत्सव, भगवान शिवांनी विष प्राशन केले खरे परंतु ते ठेवले कंठातच ते गळ्याच्या खाली उतरू दिले नाही आणि बाहेर ही टाकले नाही
आणि आपण ज्यांचा हा उत्सव साजरा करत आहोत तो फक्त उपवासाच चमचमीत खाण्यासाठी,,
आपल्या ही आयुष्यात आपण देखील कुणाचा राग, कुणाचा द्वेष ,रुसवा, कुणी केलेला अपमान, रोजच्या रोज हे विषरूपी प्राशन करतच असतो
परंतु ठेवतो कुठे तर एकदम हृदयात
हृदयातून ते डोक्यात आणि मग ते उतरत कृतीत
,,,,,यातून नन्तर पश्चाताप करण्यात मग मात्र काहीच हशील नसतो
असली कुठली गोष्ट आलीच तर कुठे ठेवायची हे ज्याला कळलं त्यालाच त्यालाच #*शिवाराधना* समजली असच समजावं ,,,
हो त्यासाठी आपल्या आतल्या सत्कर्माचा ,सद्विचाराचा राम, ती साधना इतकी वाढवावी लागेल की बाहेरून विष देखील फिके पडेल तीच असेल खरी महाशिवरात्री
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
!! हर हर महादेव !! सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!बम बम भोले !!💐💐💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Comments
Post a Comment