आणि डॉ काशीनाथ घाणेकर,,,
युट्युब , पहिली झलक सिनेमाची आली
आणि सुबोध भावे जरी आवडता नट असला तरी डॉ साहेबांच्या भूमिकेला तो अजिबात सूट नाही ही एकंदर सुबोधच्या गोबऱ्या गालावरून मी कल्पना करून घेतली😏😏
छ्या हा कसला काशीनाथ घाणेकर शोभतोय?
कारण घाणेकर म्हणजे बारीक चणीचा , घाऱ्या डोळ्यांचा, बेबंद, बेदरकार, आग्रही , बेपर्वा, मला कोण काय बोलताय ,याही पेक्षा मी बोलतोय ते लोकांना आवडलंच पाहिजे आणि ते आवडण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असलेला
करेन त्या कामात आपली छाप सोडणारा,,,,
हा असला काशीनाथ सुबोध भावेना कसा जमेल🤔❓
ह्या विचारात असताना घरी मामा आला म्हणून चिरंजीव म्हणाले दादा आम्ही जातोय सिनेमा ला तुम्ही येताय का?
कुठला?
डॉ काशीनाथ,,,
सिनेमा पहायला आशा द्विधा मनस्थितीत गेलो
आणि पाचव्या मिनिटालाचा
सुबोध भावेंनी संभ्रम दूर केला,,,
मी जसा संभ्रमात होतो त्याच प्रमाणे
त्या सिनेमात दाखवलेले मा दत्ताराम देखील ,, कारण ते संभाजीवर चित्रपट बनवत असतात आणि संभाजी म्हणजे 6 फूट उंची मजबूत बांधा आणि घाणेकर म्हणजे किरकोळ शरीरयष्टी वर घारे डोळे? हा कुठून संभाजी करणार चल हो बाहेर अस म्हणत बाहेर ढकललं जातं🤔❓
पण घाणेकरांचा आवाज ऐकल्यावर मा दत्ताराम घाणेकरांना समोर बोलवतात
आणि त्यांना पहिल्या बरोबर त्यांना एक प्रसंग आठवतो, एका एकांकिकेत एक तरुण नट दारू पिऊन अभिनय करत असतो आणि असल्या बेवड्या लोकांचं परीक्षण मी करत नाही असा सगळा प्रसंग डोळ्या समोरून जातो
ते आताही घाणेकरांना तेच सांगतात मी दारुड्या लोकांना घेऊन चित्रपट बनवत नसतो,,,
आणि त्या नन्तर मा दत्ताराम यांना परोपरीने पटवून देतो की दारू पिऊन अभिनय केला नव्हता,,,
मा दत्ताराम काही ऐकत नाहीत,,,
आता यांना कस पटवून द्यायचं हा विचार करत असलेला आजचा सुबोध भावे जी काही दारुड्याची ऍकटिंग करून दाखवतो की ज्याचं नाव ते👌👌👍👍
आणि पुढे 3 तास सुबोध भावे लाल्या बनून पडद्यावर जो धुमाकूळ घालतो
तो म्हणजे त्याच्याच शब्दात सांगायचे म्हणजे
*एकदम कडssssक*
बाकी उर्वरित सिनेमा बघण्या आधी पणशीकर घाणेकर दोस्तीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल *मित्र असावा तर प्रभाकरराव पणशीकरांसारखा*
आणि विरोधक ही कसा नसावा तर तो डॉ लागूं सारखा त्यांची जी काही खिल्ली उडवली आहे घाणेकरांनी की पुछो मत😂
आणि डॉ लागूं बोलायचं बद्दल तो नटसम्राट मधील एक डायलॉग मात्र सतत ते लागूं च पत्र पाहताना कानात वाजत राहत
जे विक्रम गोखले नानाला रागाने बोलतात पण त्यांच्या त्या बोलण्यात ही एकमेकांवरच प्रेम दिसत पण इथे ते दिसत नाही
*तू नट म्हणून भिकार्डा आहेसच पण माणूस म्हणून देखील नीच आहेस*
*तेव्हा आवर्जून पहा वर्गातला सर्वात ब्रिलियंट मुलगा*
खर तर मराठी सिने निर्माते यांना आणि सुबोध भावे या दोघांनाही आग्रहाची एक विनंती आहे या पुढे सुबोध भावे यांचं सिनेमात त्यांच नाव लिहिताना *नावा आधी आणि लावावे*👏👏
एक नवे *सुबोध पर्व* सुरू करावे👏
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments
Post a Comment