Skip to main content

कफन आणि हिंदुत्व अर्थात कफन का हिसाब तो देना ही पडेगा,,


काल सहज गुगल बाबांशी बोलता बोलता आमच्या शाळेत ऑफ पिरियेडला आमच्या एका हिंदीच्या सरांनी सांगितलेली गोष्ट वाचनात आली,,
#कफन प्रेमचंद यांची ती गोष्ट त्या आमच्या कुलकर्णी सरांची खूप आवडीची गोष्ट आणि मी ही त्यांचा लाडका झालो होतो,,,
कारण ही तसच होतो सगळे लोक ती गोष्ट त्यांच्याकडून ऐकत ते ही ती आवडीने सांगत पण त्या गोष्टीवर प्रश्न फक्त एकदा मीच विचारला होता,,,
गोष्ट आहे #कफन ची, गोष्ट आहे बुधिया, माधव, आणि घिसू ची,,,
माधवची बायको बुधिया पोटुशी असते आजारपणा कंटाळून खोकुन खोलून जीव नकोस झालेला असतो आणि हे बाप बेटे पिऊन तरर असतात काही कामधंदा न करणारे आळशी ऐतखाऊ,,
सुनेच ते विव्हळण ऐकून बाप मुलाला बोलतो की अरे बघ जरा तिला पण तो नालायक मुलगा बोलतो, साला मरणारच आहे तर अशी खोकून विव्हळून त्रास कशाला देते साली मरत का नाही??
संध्याकाळ होते तशी शेवटी बुधिया प्राण सोडते, घरात 18 विश्व दारिद्र्य आणि त्यातही बाप घिसू आणि मुलगा घिसू कर्मदरिद्री,, काही काम धंदा न करणारे
फुकट कस मिळेल पाकीट मारून चोरी लांडी लबाडी करत लोकांना फसवत आज उद्याचा वायदा करत चरितार्थ चालवणारे हे बाप बेटे ,इथे खायला पैसे नाहीत तिथे हिचा इलाज कोण करणार ? अशी परिस्थिती, त्यातच तिचा मृत्यू होतो तसे हे #दोघे आपल्या #धुंदीतून जागे होतात
आणि रडणं सुरू करतात त्यांचा गोंधळ ऐकून आजूबाजूचे शेजारी गोळा होतात आयाबाया येतात अरेरे खूप वाईट झालं म्हणत दोन अश्रू ढाळतात,,पण प्रश्न असतो मैत उचलायाच तर त्याच्या दफन विधीसाठी पैसे लागणार मग दोघेही जातात गावात ह्याच्या त्याच्याकडे हात जोडत मदत मागतात बरेच लोक मदत करतात पाचेक रुपये अशी रक्कम जमा होते त्यांना खूपच आंनद होतो ,, विचार करतात मारणारी तर आपल्या मरणाने मेली आता तीच्या वर पैसे खर्च करून काय करायचं?
थोडी लाकडं काय अशी ही जंगलात मिळतील राहता राहील #कफन मेलेल्या बाई साठी साडी ,,बर्या पैकी, हलकी, आणि नन्तर ठरलं की आयुष्यभर जिला नेसायला नीट साडी मिळाली नाही तिला आता मेल्यावर तरी काय करायची??
बघू अंधारात देऊ अशीच पेटवून,,,
त्यापेक्षा,चला थोडी मच्छी घेऊ दोन दारूच्या बाटल्या आणि चवीला चकना वैगेरे घेऊन रात्रीच्या वेळी ते घरी परतले एकीकडे बायकोच कलेवर पडलंय आणि दुसरीकडे ह्यांची पार्टी चालू असते परन्तु पार्टीची धुंदी ओसरल्यावर मात्र पोरगा बापाला बोलतो ते ठीक पण #कफन च काय? लोक ज्यांनी आपल्याला पैसे दिले कार्य करण्यासाठी ते तर हिशोब विचरतीलच ना?
त्यावर बाप उत्तरतो नाही रे काळजी नको ज्यांनी काल मदत केली तेच उद्या करतील काळजी नको,
अरे पण कसे? जमवलेल्या पैशाचा हिशोब तर द्यावाच लागेल ना? देणार रे मला अशी नऊ पोर झाली ती अशीच उगाच का लोक ज्यांनी पाप केलेली असतात ते आपल्यासारख्या गरिबांना मदत करत पुण्य कमवतात , मुलगा बोलतो पण कस आहे उद्या आपणही मरणार पण मग वर स्वर्गात गेल्यावर काय जवाब देणार?
#कफन कुठे गेल म्हणून? काळीजी नको रे होईल बरोबर??? अस म्हणत पुन्हा दोघे पिऊन तर्र होतात,,,,
आमचे सर इथे ती गोष्ट संपवत असत,,
पण मी असा पहिला विद्यार्थी किंवा असा माणूस होतो सरांच्या दृष्टीने की ज्याने पुन्हा प्रश्न विचारला होता की सर ही झाली गोष्ट पण खरंच त्या कफनच काय? लोक जरी मदत करत असले तरी जवाब तर त्यांना द्यावाच लागणार ना त्याच काय????
आणि सर ह्याच माझ्या प्रश्नामुळे माझ्यावर जाम खुश होते ते म्हणत की सुनील असा प्रश्न विचारणारा तू पहिला,,,पण काय आहे
हा जो आपला भारत देश आहे तिथे लोकांना झालं गेलं विसरून पुढे जायची सवय आहे एक वाईट किंवा चुकीचा वागला म्हणजे आपण ही तसच वागायचं अस इथल्या लोकांच्या स्वभावात नाही
म्हणूनच इथे घडू शकत पण तुझा प्रश्न अत्यन्त योग्य आहे
#कफन_का_हिसाब_तो_देना_ही_पडेगा????
तात्पर्य:- आपणही गेली अनेक वर्षे हिंदू असूनही केवळ काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून हिंदुत्वाला बळ प्राप्त होईल या आशेने मोदी-शा जोडगळीच्या हाती सत्ता सोपान सोपवला गेल्या 70 वर्षात हिंदुत्वाची जितकी हानी झाली नाही तितकी हानी तितकी हानी 4 वर्षात झाली ,  गेली अनेक वर्षे हिंदुत्वाच्या मुद्यांवर एकत्र असणारे आज हिंदुत्वाचे जानी दुष्मन झालेत, हिंदू मध्येच कधी नव्हे इतकी फूट पडली आहे, राममंदिर सारखे अनेक मुद्दे बासनात गुंडालळे गेले आहेत त्याही पुढे जाऊन देवालया पेक्षा शौचालय, गोरक्षक हे गुंडे पर्यंत मजल गेली पण मोदीला पर्याय नाही आम्ही फिरून मोदीला मतदान करणार , पर्याय आहे का?अस म्हणत स्वतःचीच समजूत घालणार,
पण लक्षात ठेवा बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी?? मांजर डोळे मिटून किती दिवस दूध पिणार??
हिंदुत्वासाठीच सत्ता हाती सोपवली होती
हे सोयीस्कर पणे तुम्ही आज जरी दुर्लक्ष करत असाल तरी ,,,
#भाई_कफन_का_हिसाब_तो_देना_ही_पडेगा
सजन रे झूट मत बोलो 2019 मे सामना तो करना है ही

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...