Skip to main content

विनोद आणि कटू सत्य

एका विनोदाची सत्यकथा
लग्नाळू मुला मुलींनी आणि त्यांच्या आई वडिलांनी ही गोष्ट जरूर वाचावी,,,
काल रात्री व्हाट्सएप वर विनोद आला,,
की जीव द्यायच्या निमित्ताने 20 व्या मजल्यावरून एक मुलगी उडी मारते,,
तिच्या नशिबाने 17 व्या मजल्यावर एक मुलगा उभा असतो , तो तिला अलगद झेलतो आणि त्या सुंदर अशा मुलीला पाहून विचारतो प्रिये माझ्याशी लग्न करशील?
ती त्याला *हट स्टूपिड* बोलते
अर्थातच तो मुलगा तिचा हात सोडून देतो
परन्तु नशिबाने पुन्हा खाली 14 व्या मजल्यावरचा उभा असलेला मुलगा तिला वाचवतो त्या सौंदर्यवतीला पाहून तो देखील विचारतो
प्रिये माझ्याशी लग्न करशील?
पुन्हा ती त्या दुसऱ्या मुलाची
*ए बेअक्कल* अशी त्याची संभावना करते
अर्थातच तो ही मुलगा हात सोडून देतो,,
परन्तु नशीब जोरावर असलेल्या त्या मुलाला वाचवायला एक मुलगा कर्मधर्म संयोगाने आठव्या मजल्यावर उभा असतो
आणि त्याने तिला वाचवल्या बरोबर हो हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे म्हणत गळ्याला त्याच्या मिठी मारते,,,
परन्तु इथे मात्र तीच नशीब खराब असत
ती अस बोलल्या बरोबर तो वाचणारा मुलगा , मनात विचार करतो
कुठे हिला वाचवतो आहे तर ही बला माझ्याच गळ्यात पडायला पहात आहे
असा विचार करत पकडलेला हात त्याने झटकून टाकला,,,, विनोद खर तर इथे संपला होता पण का कोण जाणे
मला मात्र देवदास आणि पारो ची गोष्ट राहून राहून आठवत होती
देवदास आणि पारो दोघे प्रेमवीर पण,, देवदास ज्यावर पारो अतोनात प्रेम करत असते,,
पुढे चांद्रमुखी भेटते तीही त्याच्यावर अतोनात प्रेम करत असते परन्तु आता त्याला पारो ची आठवण येते तो पुन्हा पारोच्या दारात प्रेमाची भीक मागायला जातो अर्थातच त्याने योग्यवेळी निर्णय न घेतल्यामुळे पारोचही लग्न झालेले असत
तिकडे चंद्रमुखी इकडे पारो पारो करत देवदास पारोच्या दारा समोरच दारूत आपलं आयुष्य बरबाद करून टाकतो
तात्पर्य:--
योग्यवेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे अनेक देवदास पारो देशोधडीला लागले अनेक मुला मुलींची लग्न रखडली ती रखडलीच आजच्या शिक्षण पद्धतीमुळे अधिकाधिक मिळणार पगार त्यातून येणाऱ्या अवास्तव मागण्या अपेक्षा ही तितक्याच कारणीभूत असतात.
लोणचं जस मुरल्यावरच चांगलं लागत तसच आयुष्यच आहे तसेच लग्नाचं आहे
जोडीदाराची किंमत आयुष्यच्या एका वळणावरच कळते तो मिळणारा जोडीदार म्हणजे तुम्हला मिळणारा पगार नव्हे जो
महिना संपल्यावर तुमच्या हातात पडेल
तेव्हा जास्त आढेवेढे न घेता योग्य वेळी योग्य जोडीदाराची निवड करा
संसार चित्रपटात अनुपम खेर जो एक टेलर असतो तो आपल्या मुलीला सांगतो
मुली आपण सारेच बाजारातून हव्या त्या रंगाचा हव्या त्या पोताचा कपडा घेऊन येतो परन्तु तो तेव्हाच वापरतो जेव्हा टेलर आपल्याला हव्या असलेल्या मापात तो कपडा शिवून देत नाही
आयुष्यच असच आहे
आज प्रत्येकजण कमवत असल्यामुळे
अर्थातच माझ्यापेक्षा जास्त नाही पण माझ्या इतका कमावनारा हवा
एकटाच हवा , घरात डस्टबीन नकोत
अशी एक ना अनेक कारण पुढे करायची
आणि म्हातारपणी एकटेपणाच दुःख कुरवाळत पैशाच्या जोरावर वृधश्रमात मरायचं किंवा कुठल्या तरी गल्ली बोळात निराश्रित म्हणून
पैशाची, सौंदर्याची, शिक्षणाची गुर्मी नको तर घराची आणि तुमची श्रीमंती मोजली जाते ते तुमचे जवळचे किती,यावर
तेव्हा लग्ना बाबत चाल ढकल करणार्यानी योग्य निर्णय घ्यावा कारण आज मिळणाऱ्या पगाराच्या गुर्मीत समोऱ्याची किंमत आज कदाचित कळणार नाही किंवा कळून घेणार नाहीत
पण वयाची आणि लग्नाची 50 ओलांडली
हळू हळू जोडीदाराची किंमत कळू लागते त्याच आपल्या जीवनात असलेपणाच महत्व कळू लागत *पण वेळ निघून गेल्यावर उपयोग नसतो जशी त्या वरून पडणाऱ्या मुलीला शेवटी कळत की एका नशेत आपण उडी मारली खरी दोघांनी आपला जीवही वाचवला होता पण एका मस्तीत त्यांना झिडकारले होत आता या शेवटच्या मुलाला हो नाही बोललो तर कपाळमोक्ष म्हणून ती तो बोलायच्या आताच त्याला लग्नाचा होकार देते पण नियतीने मात्र सारे नकारच पचवल्यामुळे पलटी मारलेली असते आणि त्याचा शेवट एकटेपणाच दुःख कवटाळत जीव जाण्यात होतो*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...