जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढता लढता वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी. दोन लहान मुलांची आई. कुणाची तरी लेक. कुणाची तरी बहिण, कुणाची तरी भावजय. आणि आता, देशासाठी लढण्याचा निर्धार केलेली भारतीय सैन्याची एक शूर अधिकारी.
कर्नल संतोष महाडिक देशासाठी लढता लढता हुतात्मा झाले, तेव्हा स्वाती दुःखावेगाने चिरडून जरूर गेल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात पेटून उठले होते अंगारे. जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा लाजाहोमाच्या अग्नीला साक्षी ठेऊन त्यांनी पतीला वाचन दिलं होतं की सदैव बरोबर वाटचाल करेन.
गेल्या वर्षी पतीच्या चितेच्या अग्नीला साक्षी ठेऊन, डोळ्यातले अश्रू पुसून त्यांनी संतोषना मनोमन दुसरं वचन दिलं, 'तुमचे राहिलेले काम मी पुरे करेन. तुमच्या जागी मी आर्मीत जाईन. देशासाठी लढेन.'
ते स्वप्न पुरं करणं सोपं नक्कीच नव्हतं. सैन्य भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते. त्यात त्यांचं वय त्यांच्या विरुद्ध होतं. सैन्यात अधिकारी म्हणून जॉईन होण्यासाठी जी कमाल वयोमर्यादा असते ती स्वाती महाडिक कधीच ओलांडून गेल्या होत्या, पण संरक्षणमंत्री श्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल दलबीर सिंग यांच्या शिफारसीवरून खास स्वाती महाडिक यांच्यासाठी वयाची अट शिथिल केली.
परीक्षेला बसायची परवानगी मिळाली, पण सैन्यात अधिकारी म्हणून भरती होणं सोपं थोडंच आहे? त्यासाठी शारीरिक, मानसिक अशी सगळीच तयारी लागते. त्यासाठी स्वाती महाडिक यांना खूप कष्ट घ्यावे लागले, खूप त्याग करावा लागला. SSB च्या चाचणीची तयारी व्यवस्थित करता यावी म्हणून त्यांनी काळीज घट्ट करून मुलांना बोर्डिंग स्कूल मध्ये घातलं. लहान असली तरी मुलं ही वीराचीच मुलं. त्यामुळे त्यांनी आईला समजून घेतलं. दिवस-रात्र मेहनत करून स्वाती निवड प्रक्रियेत यशस्वी ठरल्या, आणि आता चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मध्ये प्रशिक्षणाकरता त्या चालल्या आहेत.
एका सावित्रीने स्वतःच्या पतीच्या आयुष्यासाठी प्रत्यक्ष यमाशी झुंजून त्याला परत आणलं. स्वाती महाडिक आपल्या दिवंगत वीर पतीचं अधुरं राहिलेलं स्वप्न पुरं करण्यासाठी आपल्या दुःखाला आवर घालून आपल्या पतीच्या जागी देशासाठी लढणार आहे. ही खरी सावित्रीची लेक.
- शेफाली वैद्य

Comments
Post a Comment