सगळया स्त्री मुक्तीवाल्या बायकांना सांगा, ``आम्ही सगळया कार्यक्षेत्रात जायला तयार आहोत. पण आमच स्त्रीत्व जपून जाणार आहोत !'' आपल्या स्त्रीत्वाच कुठेही आम्ही बलिदान देणार नाही आणि आम्हाला ते चालणार नाही. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाच रान मोकळं करून दिलं. सावित्रीबाई फुले एवढ्या शिकल्या, पहिल्या शिक्षिका झाल्या; पण डोक्यावरचा पदर कधी बाईचा खाली आला नाही. कपाळावर नवर्याच्या नावाची लावलेली चीर नवरा असेपर्यंत कधीही पुसली गेली नाही. दोन वाट्या ज्या जाड्या पोटलीत गुंफलेल्या होत्या, त्या कधी काढून टाकल्या नाहीत. पायातल्या जोडव्यांनी तीला संपूर्ण समाज जोडायला शिकवला. ज्योतीबांनी सांगितले म्हणून त्या शिकल्या, पोरींची शाळा काढली, मुलाला सांभाळलं आणि त्यांच्या खांद्याला खांादा लावून सत्यशोधक समाजाचं कामही केलं. सावित्री नवर्याशी एकरूप झाली होती. सावित्रींना आदर्श मानणार्या स्त्री मुक्तीवाल्यांना हे लक्षात येईल का ?
अपर्णा ताई
अपर्णा ताई
Comments
Post a Comment