*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे*
पूर्वी आजच्या सारखी परिस्थिती नव्हती सागर नद्या,
आकाश त्याचप्रमाणे माणसाच्या मनाचा तळ स्वच्छ दिसत असे
त्यामुळे तेव्हा tv मोबाईल इंटरनेट च जाळ नसल्यामुळे मुलांना खेळ लगोरी कबड्डी पतंग सूर पारंब्या असे मैदानी खेळ खेळले जात
आकाश निरभ्र असल्या मुळे रात्री हमखास आम्ही शहरात असल्यामुळे गच्चीवर झोपत असू मग आपसूकच टक्क उघड्या डोळ्यांनी जितकं आभाळ डोळ्यात सामावून घेता येईल तितकं सामावून घेत झोपी जात असू पण या दरम्यान बरेचदा संध्याकाळी
घरी हंस पक्षांचा थवा उडत जाताना दिसे,,,
मी बरेचदा टक लावून पहात बसत असे ते इंग्रजी *V* आकारात उडत असत मला नेहमी असा प्रश्न पडे की हे असेच का उडतात? मागच्याला पुढे जावस वाटत नाही का? की पुढचा मागच्याना उडुच देत नाही? बर ते मान्य केलं तरी मग मधले काय करतात? ते का जोर लावून पुढच्याला ढकलत किंवा बाजूला होत स्वतः उडत???
आता *त्यावेळी आमचा गुगल म्हणजे आमची आजी* तिच्याशिवाय कोण उत्तर देणार???
मग आजी उत्तर देत असे
अरे बाळा तू शाळेत जातोस की नाही ते तुझ्या पुस्तकात विमान पाहिलस की नाही? ते असच इंग्रजी *V* आकारासारखं असत मानवाला निसर्ग सारखा शिकवत असतो इंग्रजी *V* आकारामुळे त्याला हवा कापन सोपं जातं
पुढचा म्होरक्या जो असतो ते विमानाचं नाक येणारी संकट प्रथम ते झेलत ते झेलायला योग्य ती साथ मधली मंडळी करत असतात , मागच्याना थोडा आराम असतो आशा तर्हेने एका दमात ते 10 तास तरी नक्की उडत जातात अशावेळी पुढचा दमला तर मागचा त्याची जागा घेतो व नव्या दमाने तो संकटाला समोर जातो हे बदलत राहत पण कुणी शिस्त मोडत नाही बघ आपल्या घरात तुझे आजोबा आज सर्वात पुढचे राजहंस आहेत मागोमाग त्यांचे भाऊ बहीण काका मामा आम्ही या घरात आलेल्या लेकी सुना आहोतच सोबत आणि सर्वात मागे तू माझा लाडका सोन्या अस सगळं हंस पुराण सांगत जवळ घरात डोक्यावरुन हात फिरवत गालाचा मुका घेत असे त्या मुक्याच्या गोडीला कितीही किमती मिठाई पुढे ठेवली तरी फिकी पडेल,,
परन्तु कालांतराने जस जसा मोठा होऊ लागले तस तस जाणवू लागलो त्या हंसाच माहीत नाही आताशा दिसत नाहीत आकाशात *पण आज्जी खोट्टी आहे ती खोट बोलत होती* अस वाटू लागलं होतं तस जाणवत होतं आणि आता ते प्रकर्षाने प्रत्यक्ष दिसत देखील,,
आता माणस बदलली त्यांचे जगण्याचे संदर्भ बदलले त्यांचं प्रत्येकाचं स्वतंत्र आभाळ आहे आणि त्यात त्याला एकट्यालाच विहार करायचा आहे कुटुंबा सोबत उडायची मजा घेत 10 तसाच अंतर कापायच नाही तर ते स्वतःच्या जोरावर ते कापायचे आहे आणि ते अंतर कापताना अडथळा म्हणुन जर आपलीच नाती येत असतील तर तीही त्याला कपायचीच आहेत तो एकत्र उडण्यातला आनंद एक दमला तर दुसऱ्याने मदत करण्याचा आनंद त्याला आता नकोय
*आजी आजोबा ताई दाजी काका काकी मामा मामी* ही सारी कालबाह्य नाती आता त्याला जपायची नाहीत *प्रोफेशनल नाती मात्र जीवापाड जपतो तो आज*
हिंदी सिनेमातील एक गाणं आठवत,,
गैरो पे करम अपनो पे सितम ए जाने वफा,,,
आणि भगवान श्रीकृष्णच गीतेत एक वचन आहे
*जिथे मी आहे तिथे मी नाही आणि जिथे मी नाही तिथे मी आहे*
आणि हा कळत नकळतपणे आलेला मी पणा बाजूला सारला तरच *आयुष्यसोहळा* मजेत जगता येतो त्यापुढे मग सारच *स्वनिर्मित सोहळे* फिके ती फक्त कारण असतात एकत्र येण्याची
पुढची 10 तासांची उड्डाण नव्या दमाने नव्या गड्याने मोहीम हाती घेत आपल्या मजबूत कवेत एकत्र घेण्याची आता हे सोहळे त्या राजहंसारखे जगायचे की नाही हे तुम्ही ठरवायचं
बाकी आजच्या परिस्थिने जरी आज्जीच्या या गोष्टीला आणि आज्जीच्या विचारसरणीला खोटं ठतवल असलं तोंडघशी पाडलं असलं तरी
माझी आज्जी खोटी नव्हती नाही तिचे विचार
आता बरेचसे बगळे राजहंसारखे स्वतःला समजत असले तरी प्रत्यक्ष प्रतिबिंब पाहिल्यावर राजहंस त्या बगळ्यां मध्ये रमत नाही असं एक सुंदर मराठी गाणं देखील आहे *एका तळ्यात होती बगळे पिले सुरेख,,,* पण स्वत्वाची जाणीव झालेलं ते राजहंसी पिलू त्या बगळ्यांमध्ये राहत नाही उडून जात आपल्या माणसांकडे नव्या जोमाने आकाशात विहार करण्यासाठी आता आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे तुम्ही राजहंस आहात की बगळे
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments
Post a Comment