Skip to main content

कथा बाऊबीची- कथा मनाच्या ताकदीची,,

कथा बाऊबीची- कथा मनाच्या ताकदीची,,

रविवारच्या लोकसत्तात आलेली गोष्ट,,
नाव झटकन लक्षात नाही येत ना?
पण
बचेंगे तो और भी लडेंगे,, म्हणणारा कोण हे सांगावं लागत नाही
पावनखिंड खिंड कि बाजी प्रभू,
सिंहगड म्हंटला कि तानाजी
मेरी झान्सी नहीं कि झान्सी कि राणी,
हि प्रेरणा दाई नाव आहेत
ज्यांनी अशक्य या शब्दावर मात केली,,
हि तशीच एका सामान्य माणसाची
हि गोष्ट,,
नव्वदीच्या दशकातील,,
एका न्यूरॉलॉजिस्ट ने सांगितलेली,,
जॉ डॉमिनिक बाऊची ची आणि त्याने लिहलेल्या 
द डायव्हीग बेल इन द बटरफ्लाय ह्या पुस्तकाची,,,
हे सारं इतकं खरं आणि प्रेरणादायी आहे मनाची ताकद दाखवणार आहे की ह्या कडे पाहिलं तर अस वाटत
रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक लिहिले ते मनाची ताकद काय असते निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकता,,
ते दाखवण्या साठीच हे पुनः एकदा मनावर ठसत,,,
सामान्य ते असामान्य असा हा प्रवास
पाहताना आपण थक्क होतो.
येत्या 7 सप्टेंबरला रिओ येथेच पॅरलिंपिक्स मध्ये अशाच
सामान्य ते असामान्य लोकांचे
खेळ पाहायला मिळणार आहेत
असो,,,
तर जॉ डॉमिनिक बाऊबी हा फ्रेंच माणूस पॅरिस राहणारा व्यवसायाने पत्रकार आणि जगप्रसिद्ध 'एल' (ELLE)  या फेशन मासिकाचा मुख्य संपादक असा बहुचर्चित प्रसिद्दी च्या कायम झोतात असलेला 
सार काही व्यवस्थित चाललं होतं
आणि तो दिवस उजाडला,,
8 डिसेंम्बर 1995 त्या दिवशी आपल्या आलिशान कार मधून जात असताना अचानक त्याच्या मेंदूतून
रक्तस्त्राव सुरु झाला आणि तो बेशुद्ध पडला,,
जवळ पास वीस दिवस तो कोमात होता त्यांनतर तो शुद्धीवर आला खरा
परंतु शरीरातील एकही अवयवाची होत हे लक्षात आल,,,
मेंदूतील रक्तस्रावामुळे हे झालं होतं.
त्यामुळे निदान अन्न घेणे बोलणे हे हि दूरच,,,
अशा अवस्थेत फक्त एक डाव्या डोळ्याची पापणी तिची उघडझाप करणे हेच फक्त जमत होत
जगाशी संवाद साधण्याचा ते एकमेव मार्ग होता,,,
बाऊबीच्या या स्थितीला लॉक इन सिंड्रोम म्हणजे आपणच आपल्या शरीरात बंदिस्त होणे म्हणतात,,
शारीरिक पातळीवर बाऊबी पूर्णपणे अधू झाला असला तरी त्याच्या मेंदूचे
कार्य उत्तम चालू होते
त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर मजले होते तोंड देण्यावाचून गत्यंतर नव्हते आणि मनाशी त्याने विचार केला आणि त्यानं एक चक्क पुस्तक लिहिले,,
शरीराने काहीही करता येत नसताना
केवळ एका मशीनच्या मदतीने पुस्तक लिहिले या मशीनला
पार्टनर असिस्टड स्कॅनिंग म्हणतात एक एक अक्षर त्या मशीन द्वारे त्याच्यापर्यंत पोहचवल जात असे जेव्हा जेव्हा समोर बरोबर अक्षर आलं की त्याची पापणी उघडझाप करायची त्याची मदतनीस ती अक्षर लिहायची अस एक एक अक्षर करत त्याने लिहिलं एका शब्दासाठी किमान 2/3 मिनिटं जायची अशा तर्हेने पुस्तक पूर्ण करण्यासाठी बाऊबीला,, 
दोन लाख पापणी हलवावी लागली अशा तर्हेने त्याने,,
द डायव्हिंग बेल एन्ड द बटरफ्लाय हे पुस्तक लिहिले.

डायव्हिंग बेल म्हणजे ही घंटेच्या आकाराची लोखंडी पेटी त्यात माणसाला बसवून समुद्राच्या तळाशी सोडलं जात आता कल्पना करा ,,
जेमतेम बसता येईल इतकीच जागा सभोवती मिट्ट अंधार आणि खोल खोल जाण म्हणजेच बाऊबीच जगणं होत,, हीच त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था शिर्षकातून दाखवली आहे अशा या पुस्तकाची
अनेक भाषांतरे झाली आहेत
हॉलिवूड मध्ये यावर चित्रपट देखील निघाला आहे आलीकडेही
ह्रितीक रोशनचा गुजारीश असाच प्रयत्न केलेला चित्रपट होता
तर असा हा बाऊबी आणि त्याची गोष्ट पण मग आपल्याशी काय संबन्ध?????
आपल्या शरीराशी नाही पण मनाशी मात्र नक्की आहे,,
माणूस हा मनानेच जगत असतो
मनात आणलं असत तर अस सहज बोलतो म्हणून तर समर्थानी
मना सज्जना अशी साद घालून त्याला आदेश दिला आहे
आपल्या बऱ्याचशा काळज्या आणि चिंता मूळ कारण हे मनच असत
मनच मारत आणि मनच तारात
हेच खरं तेव्हा मनाच्या अधीन होऊन
त्याला आदेश द्यायचे कि 
कि मनाचा हा आतून घट्ट लावलेला दरवाजा आपणच त्या चिंता काळज्या संभ्रम फेकून देऊन स्वच्छंदी फुलपाखरा सारखं हवेवर स्वार व्हायचं??
आपल्या आयुष्यात बरेचसे नको असलेले अनुभव हे या मनाच्याच्याच विकारातून येतात हे विकार म्हणजेच
अति क्रोध, अति आळस ,अति लोभ
अति मत्सर ,अति नैराश्य याचा कधी तरी आपल्याला उपयोग झाला आहे काय????
माझ्या जवळ अमुक नाही ,नाही तर मी अस केलं तस केलं असत अशा
वलग्ना मारणारे आम्ही
 कधी तरी या बाऊबी कडे काय होत
एक पापणी हलवण्या पलीकडे याचा कधी तरी विचार करणार आहोत का?? हाच प्रश्न या निमित्ताने विचारावासा वाटतो.
कळत नकळत आपण आपल्या विचारांच्या कल्पनांच्या गैरसमजूतीच्या नैराश्येत स्वतःला
लॉक इन तर नाही ना करत??
म्हणजे बघा पटत का???
उदा. आपल्या वाढदिवशी किंवा कुठला सण आला दिवाली आली की आपण आनंदी असतो की नाही? वाढदिवशी एक आणि इतर दिवशी एक अस असतो का आपण ?
पण या दिवशी आपण ठरवलेलं असत नाही आज आनंदात रहायचं आणि आवण राहतो मग
एक दोन दिवस का 365 दिवस आनंदात राहू ऐकायला खूप सोपं वाटत पण ठरवलं तर अवघड देखील नाही
आपल आयुष्य सुखात आनि आनंदात जावो हीच सदिच्छा
आपला
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...