Skip to main content

मी खीर खाल्ली तर,,,,

मी खीर खाल्ली तर,,,,
परवाच टीव्हीवर एफडीआय चा तमाशा पाहत होतो आणि एफडीआयच्या
विरोधात बोलणारे कोंग्रेसची भलामण करत होते ते पाहत होतो आणि मला त्याचा खरा अर्थ कळला
"एफडीआय" म्हणजे काय?
"फिक्स डीपोझीट इन ईटाली"आणि म्याडमला नाखुश करणे आजच्या
घडीला कुणालाही झेपणारे नाही,,,
त्यासाठीचा हा उंदराला मांजर साक्क्षचा खेळ,,
आणि आठवला मला असाच एक खेळ,
उंदीर मांजर आणि माकड आपल्यातल्या सदविवेक बुद्धीला साक्षीला ठेवून खेळलेला
तो खेळ ,,
"मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी",,,
किती साधा सोप्पा न्याय होता आठवा जरा,
एकदा माकड,मांजर,उंदीर एकत्र येतात आणि खीर बनवून खायचा बेत आखतात,
उंदीर,रवा आणि साखर आणतो,
माकड,पातेल आणतो,
मांजर,दुध आणत,
आणि सारे मिळून नदीच्या तीरी खीर बनवतात.
त्याच्या गोड गोड वासाने सारेच खुश होतात आता खीर कधी खातो असे त्यांना होते,
पण थोडा धीर धरू आंघोळ करून घेवू तोपर्यंत खरी थंड होईल
ह्या विचाराने माकड आणि उंदीर आंघोळीला जातात आणि जाताना
आम्ही येई पर्यंत खीर खावू नको अस मांजराला बजावायला ते विसरत नाहीत,
परंतु मनात काळ असलेली मांजर वरकरणी हो बोलते ,
खरतर खीर कधी खातेय अस तिला झाल होत,
त्यांची पाठ फिरते न फिरते तोच ते खिरीच भांड थोड थोड करत संपवते,
खीर खावून ती मस्त पैकी ताणून देते,
ईकडे दोघाही आंघोळ करून येतात बघतात तो काय खिरीच भांड खाली पाडलेल
आणि मांजर झोपलेली तिला उठवून विचारतात खीर कुणी खाल्ली ?
तस कानावर हात ठेवते वर माझ अंग ठणकत होत म्हणून मी तर झोपले होते
असा गोंधळ घालते आपल्या ईतक्या दिवसांच्या मैत्रीचा हा बदला देता होय?
असा खोटा कांगावा करते,
आता काय करायचं ?साक्षीदार तर कुणीच नाही ?
खऱ्या खोट्याचा निकाल कसा लागायचा?
आणि ठरत आपल्या सदविवेक बुद्धीला साक्षीला ठेवून
ज्यात खीर बनवली आहे ती घागरच पाण्यात उपडी ठेवायची आणि
त्यावर उभा राहून बोलायचं ,,,
"मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी,,,"
त्याप्रमाणे आधी उंदीर उभा राहतो
"मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी,,,"अस बोलतो पण
घागर काही बुडत नाही,
आता माकड उभे राहते,
"मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी,,," घागर आताही बुडत नाही,
आता पाली येते मांजरीची आणि आपल्या
लटलटत्या पावलांनी ती घागारीवर उभी राहते आणि बोलते
"मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी,,,"
अर्थातच घागर बुडते आणि उंदीर आणि माकड यांना न्याय मिळतो
आणि मांजराला शिक्षा ,,,,
झटक्यात दुध का दुध और पाणी का पाणी ,
कुठलीही चौकशी समिती नाही ,कुठलही न्यायालय नाही ,
कुणी पोलीस नाही,कुणी साक्षीदार नाही तरीही न्याय मिळतो,,?
परंतु नैतिकतेचा मुडदा पडणारे राजकरन्यांन सकट सारेच आपण ,,
त्यामुळे न्याय देणारे भरपूर परंतु न्याय मिळेल का हि भावना लोपलेली,,
तात्पर्य--आज जर या साऱ्या हरामखोर राज्यकर्त्यांना जर खिरीच्या
पातेल्यावर उभ करायला गेलो तर ते पातेलच गायब करतील ईतकी तरबेज मंडळी,,,
अरे खीरच बनवली नाही तर खायचा प्रश्नच कसला येतो ?
खीर शिजलीच नाही,तर खाणार कशी ?
बर ईतक करून त्यांना उभ राहायला सांगितलं तर
घागर पाण्यावर ठेवतील आणि बाजूला उभे राहून
बुड बुड घागरी अस म्हणतील,,
घागर बुडणार कशी?
न्याय मिळणार कसा?
खरच किती साधा सोप्पा न्याय?
न्यायासाठी शेवटपर्यंत ,अगद कोर्ट बंद झाल तरी लढता येत,
पैसा देवून न्याय विकत घेता येतो ,
खोटे साक्षीदार पुरावेवून सामोरच्यालाच पुरता येत
जिथे डोळ्यावर काळीकुट्ट पट्टी बांधलेली न्यायदेवताच सांगतेय कि,
"हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एकाही निरपराध्याला शिक्षा
नाही मिळाली पाहिजे "
तिथे गुन्हेगार आणि तेही हजारो नाही कर करोडो सुटणार नाही तर काय?
आणि मग अशावेळी
जर या बोध कथाच जास्त जवळच्या वाटतात ,
झटपट न्याय आणि विश्वास मिळतो,
अलीकडेच अमेरिकेत आपल्या भारतीय कुटुंबाच्या बाबतीत
तेथील न्यायालयाने अगदी ६\७ महिन्यात न्याय मिळवून दिला होता
आणि आपल्याकडे अशीच एका खटल्याची गम्मत कळली
१८ वर्षे चाललेल्या खटल्याची शिक्षा किती तर सात दिवसांची,,,
आता बोला ?
पेट्रोल महागलय,जमीन महागलीय ,जगन महागलंय
पण न्याय किती महागलंय हे हि कुणी तरी सांगणा?
सत्यमेव जयते म्हणायला जीभ रेटत नाही आताशा
खरतर सत्य म्हंजी काय र भाऊ ? हाच खरा प्रश्न मला पडलाय.
आणि तुम्हाला ?


Comments

  1. SATISH SHINDE

    9:40 AM (12 hours ago)

    to me

    मस्त लेख जमून आला आहे

    ReplyDelete
  2. Shripad S. Kulkarni likes this.
    Ganesh Date बरीच वर्ष खीर ओरपून झाली आहे. पण ती घागर बुड बुड म्हणून बुडत नाही . आता सर्व जनतेने ती घर तोडून मोडून टाकणे आत्ती आवश्यक - अनिवार्य आहे. घडे तो दिन गुढी पाडवा .
    December 10 at 1:16am · Unlike · 1

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...