Skip to main content

कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट?????????????

काल एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज ! 
आणि ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतातशेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. 
संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.
स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक महाराज 
स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोडपाशी येऊन थांबलाय
तिथं देशद्रोह्याना मिळणार्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय. 
तुम्ही लिहिलंत गीतारहस्य गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला,,,,

बाप, भाऊ, मामा, काका, गुरू - कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन,,,,
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत, कुठल्याच द्रौपदीपर्यंत टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला डरकाळ्या फोडणार्या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक महाराज ?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे. तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे दिवसेदिवस???
प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत???
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक 

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत

इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप सारंच परकं होईल त्यांना
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय

एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली !
  

Comments

  1. एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...