Skip to main content

प्रिय गुरूजी,

आजच्या आई वडिलांना शिवाजी महारज माहित नसतील त्यानी निदान हे लिंकन च पत्र वाचून दाखवाव आपल्या मुलांना गांधींपेक्षा लिंकनचा आदर्श केव्हाही चांगला ,,,,,,,,,त्यांच्या लक्षात येईल   आपल्या देशाला खरी गरज कुणाची आहे ,अब्राहम लिंकन सारख्या बापाची की देशाला नपुंसक बनवनार्यातथाकथित महात्म्याची ? ,,,     सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात; नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.
मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गळून कमावलेला एकाच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं
शाळेत त्याला हा धडा मिळू दे -
फसवून मिळालेल्या यशापेक्षा,,,,
सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा त्यान भल्यांशी भलाईन वागाव आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा - जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भावू गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यान कामायला हवी
पुढे हे ही सांगा त्याला
ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस.
त्याला शिकवा..
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपुर समजावा की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून….
पण कधीही विक्रीय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा!
धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ,
ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्यासाठी पाय रोवून लढत राहा
त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत रहा त्याला -
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.
माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं.
माझा मुलगा -
भलताच गॊड छोकरा आहे हो तो.
,,,,,अब्राहम  लिंकन


Comments

  1. प्रफुल्ल दिंडोरकरNov 18, 2010 10:25 AM

    chaan aahe ! chokraa majha
    Reply

    ReplyDelete
  2. RupeshNov 21, 2010 07:46 AM

    जय जिजाऊ जय शिवराय*********.........
    Reply

    ReplyDelete
  3. जय जिजाऊ जय शिवराय*********tumache lekh mazya manatale asatat....mhnun tyatale kahi nivadak lekh mi mazya page vr takanar ahe.....arthat source ch navahi asel mhnje itaranahi itar lekh vachnyachi sandhi milavi....thanx for all

    ReplyDelete
  4. आजच्या आई वडिलांना शिवाजी महारज माहित नसतील त्यानी निदान हे लिंकन च पत्र वाचून दाखवाव आपल्या मुलांना
    गांधींपेक्षा लिंकनचा आदर्श केव्हाही चांगला ,,,,,,,,,
    त्यांच्या लक्षात येईल
    आपल्या देशाला खरी गरज कुणाची आहे ,
    अब्राहम लिंकन सारख्या बापाची की देशाला नपुंसक बनवनार्या
    तथाकथित महात्म्याची?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...