Skip to main content

गिरगाव व्हाया दादर

काही दिवसां पूर्वी आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला होता , 
तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे,
आणि न कळत्यावेळी अनुभव हि घेतला आहे . पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा 
प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल, 
एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती, 
आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती..
या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जाणारी

काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ?
आशी जाणीव करुन देणारी .. 
अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही 
आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे.
१०५ हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेतृत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई...
महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७व्या व ८व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२(२), ४८(१) आणि ५१(५)अनुसार गुजरात राज्याची राजधानीविकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्याची वाषिर्क तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७०पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले. याखेरीज १९६२-६३पासून १९६९-७०पर्यंत ८ आथिर्कवर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.

बॉम्बे रिऑर्गनायझेशन १९६०च्या कलम ५२खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडियाएक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.


याचाच अर्थ, 

मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे.
या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून,कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत!
नाटकाच्या शेवटच्या दृष्यात खुप भयान आणि वास्तवातला एक प्रसंग चितारला आहे मन हेलावनारा आणि डोळ्यात अश्रु येता येता एक सामाजिक बांधिलकीची जाण करुन देनारा. संयुक्त महाराष्ट्राच्या अंदोलनात हुतात्मा झालेल्याची एक विधवा फ्लोराफांऊट जवळ चळवळीच इतिहास आठवत आसते मध्येच एक 14 वर्षाचा मुलगा तिच्या कडे विस्मयाने बघुन तिचा तिरस्कार करुन निघुन जातो. प्रसंग संपतो...


पण प्रत्येक रसिकाला अंर्तमुख करुन जातो..


जी मुंबई महाराष्ट्रात आनन्या साठी ज्या ज्ञात अज्ञात हुतात्म्या नी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, लाठ्या खाल्या काठ्या खाल्या वेळ आली तेव्हा बलिदान केले त्या हुतात्म्या बद्दल आजच्या या तरूणपीढी ला काहीच माहीती आज शंभर पैकी जेमतेम फक्त 20 तरुणांना या मुबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माहीत आहे. कीती लज्जास्पद आहे... कारण हा इतिहास कधीच या पिढीला शिकवला गेला नाही सांगीतला गेला नाही.आजही मुंबईला बाँम्बे म्हणुन संबोधनारे कीती मराठी महाभाग मी याच महाराष्ट्रात पाहीले आहेत हेच याच एक ज्वलंत उदाहरण,जसा भारताच्या स्वंतंत्र्य लढ्याचा इतिहास आहे तसाच दुर्देवाने मराठी माणसाला महाराष्ट्रा सहित मुंबई , आम्हाला या दळभद्री कांग्रेस विरुध्द संघर्ष करुन घ्यावी लागली आहे. हा ही एक इतिहास आहे.. हा इतिहास आजच्या तरुणपीढी पर्यत पोचायलाच हवा कारण भविष्यात पुन्हा आसे कुटील डाव होनारच , आणि वेळी रक्तरंजीत इतिहास या पिढीला माहीतच नसेल तर आमची हि मुंबई हातची गेली म्हणुन समजा. हा इतिहास हस्तांतरीत करण्याचे काम आपल्या सगळ्यांच आहे, प्रत्येक मराठी मानसाला आभिमानाने जर मुंबईत राहायचं आसेल तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रत्येक मराठी घरात घरात पोचलीच पाहीजे, जर हा इतिहास पोचलाच नाही आणी उद्या जर यदा कदाचीत मुंबई महाराष्ट्रतुन वेगळी झालीच तर आपल्या कर्माला दोष देत बसु नका !


मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्रत्येक मराठी तरुणा पर्यत पोहचलाच पाहीजेत यासाठी, भविष्यात मुंबई वेगळी करन्याचा प्रयत्न कोणी केलाच तर पुन्हा या क्रांती च्या मशाली सत्ताधार्याच्या घश्यात घालन्या साठी या पिढीला आत्ताच जागे केले पाहीजेत..

Comments

  1. Sunil Bhumkar जी मुंबई महाराष्ट्रात आनन्या साठी ज्या ज्ञात अज्ञात हुतात्म्या नी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, लाठ्या खाल्या काठ्या खाल्या वेळ आली तेव्हा बलिदान केले त्या हुतात्म्या बद्दल आजच्या या तरूणपीढी ला काहीच माहीती आज शंभर पैकी जेमतेम फक्त 20 तरुणांना या मुबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माहीत आहे. कीती लज्जास्पद आहे... कारण हा इतिहास कधीच या पिढीला शिकवला गेला नाही सांगीतला गेला नाही.आजही मुंबईला बाँम्बे म्हणुन संबोधनारे कीती मराठी महाभाग मी याच महाराष्ट्रात पाहीले आहेत हेच याच एक ज्वलंत उदाहरण,जसा भारताच्या स्वंतंत्र्य लढ्याचा इतिहास आहे तसाच दुर्देवाने मराठी माणसाला महाराष्ट्रा सहित मुंबई , आम्हाला या दळभद्री कांग्रेस विरुध्द संघर्ष करुन घ्यावी लागली आहे. हा ही एक इतिहास आहे.. हा इतिहास आजच्या तरुणपीढी पर्यत पोचायलाच हवा कारण भविष्यात पुन्हा आसे कुटील डाव होनारच , आणि वेळी रक्तरंजीत इतिहास या पिढीला माहीतच नसेल तर आमची हि मुंबई हातची गेली म्हणुन समजा. हा इतिहास हस्तांतरीत करण्याचे काम आपल्या सगळ्यांच आहे, प्रत्येक मराठी मानसाला आभिमानाने जर मुंबईत राहायचं आसेल तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रत्येक मराठी घरात घरात पोचलीच पाहीजे, जर हा इतिहास पोचलाच नाही आणी उद्या जर यदा कदाचीत मुंबई महाराष्ट्रतुन वेगळी झालीच तर आपल्या कर्माला दोष देत बसु नका !
    22 hours ago · Like

    ReplyDelete
  2. Shripad S. Kulkarni khup abhyaspurn lekh dada. sarvani nond ghenyajoga. kuthun mahiti milavata evdhi? tumhala salam dada!
    16 hours ago · Unlike · 1

    Write a comment...

    ReplyDelete
  3. Kaustubh Gurav ‎@ topik ते बरोबर आहे हो पण ह्या नवीन मराठी दुकानदारांना व शत प्रतिशत वाल्यांना हे कोण सांगणार?
    21 hours ago · Unlike · 1

    ReplyDelete
  4. [Offline] Susheel Patki to me

    show details 7:00 PM (4 hours ago)

    प्रिय सुनील भूमकर यांस,
    स. न. वि.वि.

    आपले सुम्बरान मधील लिखाण अतिशय मनास हेलावून सोडणारे असे आहे.. खरोक्खर हा सर्व इतिहास आपल्या तरुण पिढीला कळायला हवा - हौतात्म्य आणि वर पैशांचा लाजीरवाणा मोबदला .. आपल्या आजच्या तरुण पिढीला ह्या मागच्या भावना कधी कळतील की नाही आणि जर कळल्या नाहीत तर ... ?? आजची तरुण पिढीस फक्त पैसे दिसतात - सर्व काही शार्टकट आणि चुटकी सरशी घडलेली घटनाच आवडतात .. सर्व काही फटाफट .. मोजले पैसे की काहीही मिळते अशी यांची धारणा..

    दुसरी गोष्ट.. खास तुम्हांस सांगावीशी वाटली म्हणून लिहीत आहे.. आपल्या परम पूज्य सेनाध्यक्ष श्री श्री बाळासाहेब यांच्या साठी लक्ष्यवेधी सूचना -- दिल्लीत बसलेला व सोनिया गांधीचा खास जिवलग मियां गुलाम नबी आजाद हा स्वतः हिंदू हिंसा परीलक्षित काळा अधिनियम संसदेतून पास करून घ्यायच्या मागे लागलेला आहे व सर्व ताकद झोकून दिली आहे .. तेव्हां सरसेनापती यांनी कृपा करून त्वरित या प्रकरणाचा निकाल लावावा (थोडक्यांत या मियांची सुपारी द्यावी) .. त्यांनी जसे बाबरी मशीद विध्वंसाची जबाबदारी स्वीकारली तसेच ह्या प्रकरणी पण पुढाकार घेवून अक्ख्या देशावर उपकार करावेत .. भारतातील सर्व हिंदू त्यांना दुवा देतील याची खात्री बाळगावी..

    नेहेमी महारष्ट्र पुढाकार घेत आलेला आहे व असाच इतिहास पण सांगतो.. लोकमान्य टिळकां पासून नथूराम गोडसे पर्यंत व त्याही आधी पूज्य शिवरायां पासून पेशवाई पर्यंत चा इतिहास असाच आहे.. इतिहासाची पुनरावृत्ती नेहेमीच घडत असते, या क्षणी सर्व देश सर सेनापतिंकडे दीन भावाने पहात आहे ..

    जय हिंद .. जय महाराष्ट्र ... वंदे मातरम ..
    आपला शुभेच्छु,

    सुशील पत्की

    ReplyDelete
  5. मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे. he sar mahitch nvhat mala

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...