Skip to main content

"गावात नाही विचारात काळ कुत्र आणि फेसबुकवर हजारो मित्र"

काही गोष्टी योगायोगाने समोर येतात २\४ दिवसंपुर्विया 
एका मित्राने एक कविता पाठवली त्यात आपण सारे कसे एकमेकांपासून
दूर जावू  लगलो आहोत आधी
पत्र मग फोन आणि मोबाईल आणि आता फेसबुक वर भेटताना ही आपली कशी दमछाक होते आहे
ह्याच सुंदर वर्णन त्यात होत आणि काल परवा
आमच्या भगिनी "माता मृदुलांमयी" यांनी त्यांच्या अमर वाणीतून
या सार्या प्रकारचा एका वाक्यात विश्लेषण केल ते अस
"गावा नाही विचारात काळ कुत्र आणि फेसबुकवर हजारो मित्र"
आणि मी सहजच विचार करू लागलो जेव्हा माझ्या कडे मोबाईल नव्हता ,,,
आणि ईतरान कडे  तो होता साहजिक सारे विचारात अरे तुझा  नं. दे 
मी सहज घरातील किंवा दुकानातील नं देत असे आणि त्यांनी फोन केला कि मी कदाचित
दुकानात किंवा दुकानात केला तर घरी मग ते रागवायचे अरे मोबाईल ghena
आणि एकदाचा होय नाही करता करता मी मोबाईल घेतला
आजच्या घडीला ७००\८०० नं असतील पण खूप कमी मित्र आहेत
जे आजही मैत्री टिकवून आहेत,,,
असो तर सांगायचं ईतकच मी विचार करू लागलो ,,,
आज माझे हि नाही नाही म्हणता म्हणता फेसबुक वर १००० मित्र होतील,,,
"शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" हे फेसबुकने खोत ठरवलं त्याने नवी व्य्ख्या सांगितली
"मित्राचा मित्र तो आपला मित्र "
परंतु ईतके सारे आपले खरेच मित्र असतात?
या लोकसाठ्याचा नेमका उपयोग काय?
आज काल कुणी भेटो तो कसा आहेस? काय करतोस ?घरात सारे ठीक न?
हि चौकशी ना करता ए तू फेसबुक वर आहेस ना? हेच विचारतो,,,,

ह्याने खरच आपल्या आपल्यातील संवाद वाढले?
स्नेह वाढला? कि दरी वाढली ?
कामाच्या निमित्ताने नवे वेठबिगार झालेले हे सारे,,,,
ह्यांना कसे कळणार कि पाठीवर मारलेली प्रेमाची थाप,काय सुख देवून जाते?
येथे नुसत लाईक केल कि आपण खुश,,,,?

अरे साधा नवा मोबाईल घेतला तरी त्याचे कौतुक करायला
फेसबुक कशाला हवा? निदान जवळच्या लोकांना मित्रांना तरी तरी हे करू नये,,,
एखादी वस्तू घेतल्यावरच आनद तो फेसबुकवर दिसणार आहे का?
कारे पार्टी कधी मग? हे विचारणाऱ्या प्रेमळ स्नेह्याची सर येणार आहे का?
आनंदाच्या प्रसंगी फेसबुक वर हुर्ये आणि प्रत्यक्ष मित्राने करकचून दबलेले टाळावे
किंवा दुखः प्रसंगी दबलेला खांदा ,,,?
ह्याची सर फेसबुक वरच्या "व्हेरी स्याड" ला येणार आहे का?
मित्राने दाबलेला खांदा आणि त्यातून व्यक्त होणारा आधार आणि फेसबुक यांची
तुलना होवू शकते?

आज फेसबुकवर किती तरी ग्रुप आहेत कुणाची ५०००\१०००० संख्या आहे
पण एका हाकेला ओ देवून असे किती जमू शकतात?

पण तेच आपल्या शेजारचे, मित्र , नाते वाईक,
जे तुमच्या हाकेला एका क्षणात ओ देवू शकतात
त्यांना भेटण्यासाठी खरच फेसबुकची गरज आहे ?
फेसबुक हे साधन आहे साध्य नाही हे लक्षात घ्या ,,,


Comments

  1. Rajesh Kauthale
    FB var asha "Boru bahaddarancha" gotavala bharpur aahe. Swatach creat kelele fake accounts aani tyanchya tondun swatachi wajavileli timaki yatunach asha "Prasiddha" mitranche samadhan hote. Kahi jan tar ase hi aahet ki tyanna tyanchyach gallitil lokahi nit olkhat naahit aani yanchya gappa matra aakhya duniyet yanchyach samaj sevecha tembha petat asalya sarakha. Ikadun tikadun "Dhapun" uchalalelya kahi bin kamachya kavita kinva nirarthak charcha yatunach yanche samadhan hote.
    22 hours ago · Unlike · 2

    ReplyDelete
  2. Sagar Bhunje agde manatle bolas "फेसबुक हे साधन आहे साध्य नाही हे लक्षात घ्या ,,,"
    about an hour ago · Unlike · 1

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...