Skip to main content

बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?

कालच्या सोमवारी तारीख ८.२.११ माझ्या मामाची आईचा
माझी आजीचा दहावा होता त्या निमित्त मी हि पुण्याला गेलो होतो .
घाटावर आळंदीहून आलेले महाराज आई या विषयावर प्रवचन करत होते
आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर कानावरून जात होत ,,,,
काल घरी आलो टीव्ही वर सिरीयल मध्ये हि आईचं महात्म्य
एक आई आपल्या मुलीला सांगत होती ,,,
सांगत होती बाळा तुला सासू खूप चांगली मिळेल हि परंतु पायात काटा
अडकल्यावर धावत काटा काढायला धावत येईल हि  परंतु
आई तो कटाच पायात अडकू देणार नाही त्या त्याझ्या पायाखाली आपला हात ठेवेल ती,,,,,

आणि हे सर्व आठवताना त्या माझ्या आजीच चित्र माझ्या समोरून जात नव्हत माझी ती आजी अगदी तशीच होती,,,,,,
आणि नकळतच आजीच्या आठवणीत जात मी अचानक माझ्या
४ थी च्या वर्गात गेलो ,,,,,,
आम्हला शिकवायला त्यावेळी शुक्ला म्याडम होत्या
एके दिवशी त्यांनी आम्हाला आईची गोष्ट सांगितली होती
ती अवजड गोष्ट समजण्याच वय होत कि नाही कुणास ठावूक
परंतु माझी हि अवस्था थोडी गोष्टीतल्या तरुणा सारखीच होती कारण
त्यावेळी मी शाळा शिकायला उल्हास नगरला माझ्या आत्याकडे राहायला
उल्हास नगरला होतो त्यामुळे माझ्या हि आईची मला सारखी आठवण येत असे,,,,,
तर ती गोष्ट होती ,,,,,,,,दोन प्रेमी जीवांची ,,,,,,
संजय- संगीता( काल्पनिक नाव ) हि त्यांची नाव होती
त्या संजयचं त्या मुलीवर म्हणजेच संगीतावर अतोनात प्रेम होत
पण संगीता हि आपल्या सौंदर्याच्या तोर्यात ईतर मुलां सारखीच संजयलाहि खेळवत असे .
याने कितीही नाक दुर्या काढल्या तरी ती ताकास तूर लागू देत नसे
एक दिवस मात्र संजय एकदम घायकुतीला येवून तीला म्हणाला ,
"संगीता माझं खरच तुझ्यावर प्रेम आहे तू माझी हो नाही तर मी काही
जीवाच बर वाईट करेन "

संगीता--म्हणाली खरच कारे तुझ माझ्यावर ईतका प्रेम आहे ?
संजय --हो तर ,,
संगीता--मग तू जीव दिलास तर माझ काय होईल विचार  केलास का?
संजय-- मग काय करू कि तुझा विश्वास बसेल,,,,,,,?
संगीता -- हो तुला परीक्षा तर द्यावी लागेल तू बघतोस च
कॉलेज मधील सगळी मुल कशी दिवाणी आहेत माझी,,,,,,
बर मग ?
तुला जर वाटत असेल कि मी तुझी व्हावी तर ,,,,,,
मला तुझ्या आईच काळीज आणून दे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

हे ऐकल्या बरोबर संजयवर आभाळ कोसळायच तेव्हड बाकी राहत .

तिला बराच काही बोलयचा रागवायचं लटका प्रयत्न करतो
पण तरीही तिच्या साठी पागल झालेला संजय म्हणतो ,
मला १५ दिवस दे वचार करायला ,,,,,,,,,,,,
आणि अस म्हणून घरी निघून येतो ,
आता घरी दारी संजयच्या मनात फक्त एकच विचार
आई कडे काळीज कस मागायचं?
आई काय म्हणेल?
ती देईल का तीच काळीज काढून?
या सार्या विचारात तो ख पिन विसरतो त्याची हिं अवस्था
आईच्या लक्षात यायला वेळ लागत नाही ती त्याला विचारते
बाळ संजय कसला विचार चालला आहे ?
तू सध्या अन्नपाणी वर्ज्य केल आहेस
तुला बर नाही वाटत का?
कुणा डॉक्टरला भेटायचं का?
काय होतंय काय नक्की संग बाळा संग?
आईचं जीव टांगणीला लागला होता
तिचा लाडका बाळ संजू गेले १४  दिवस जेवला नव्हता
आणि उद्याचा दिवस शेवटचा
विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता त्याचा.....
आता काय सांगू आईला आणि उद्या सांगितला .????????????????
शेवटी आईने खोदुन खोदून विचरल्यावर त्याने सारी कहाणी सांगितली,,,,,
त्याने सांगितलं त्या मुलीची अट कि आईच काळीज आणशील तरच
मी तुझ्याशी लग्न करेन,,,
आई म्हणाली हत्तीच्या एव्हडच ना?
माझ्या सोन्या मी तुझ्या साठी ईतक हि नाही करणार कारे ?
तुझा विश्वास नाही का माझ्यावर?

माझ्या सोन्या तुझ्या पेक्षा का माझ्या साठी काळीज मोठ आहे?
तूच तर माझ काळीज आहे ते मी माझ्या कडे ठवून काय करणार?

हे घे अस म्हणत खचकन त्या आईने आपल्या छातीत
धारदार सुरा खुपसून आपल्या हाताने काळीज काढून मुलाच्या हातावर ठेवलं,,,,,,,

आणि आईने आशीर्वाद दिला मुला सुखी राहा जा मुली कडे
लवकर जा ,,,,,,,,,,,,,,,,,,
आईच्या त्या कृत्याने हतबल झालेला तो मुलगा उठला
रडत रडत च ते आईच काळीज उचलल,,, आणि धावत च तो निघाला
त्याच्या लाडक्या संगीताला भेटायला ,,,,,,
तिला पाहताच त्याने ते काळीज तिच्या पायावर वाहील आणि
म्हणाला प्रिये आता तरी माझी होशील नां?
बघ मी माझ्या आईच काळीज घेवून आलो आहे ,,,,,,
आता लवकरच आपण लग्न करू
करशील ना राणी ?
आणि त्या मुलीने खाडकन त्या मुलाचा कानाखाली मारली .
आणि म्हणाली अरे मुर्खा तुझ्याशी आणि लग्न ?
एका अनोळखी मुलीसाठी तू तुझ्या आईचं जीव घेतलास
तुझ्या सारखा मूर्ख जगात दुसरा नसेल चल चालता हो ,

आज मला मिळवण्यासाठी आईला मारलास उद्या माझ्या ऐवजी आणखी
कुणी सुंदर मुलगी भेटेल त्यावेळी तू मला मारशील    ,,,,,,,,,,

आता मात्र मुलाला काय कराव हे नक्की काळात नाही
तो सैरभैर होतो आई हि गेली प्रेयसी हि गेली आता काय करायचं जगून?
आईच्या काळजाला कवटाळून स्वतःलाच शिव्या शाप  देत राहतो  .
काय करायचं या विचारात तो काळीज उचलून धवत सुटतो
आणि एकेठिकाणी त्याचा पाय अडखळून तो खाली पडतो......
आणि हातातल्या त्या आईच्या काळजातून आवाज येतो
बाळा तुला लागला तर नाही ना,,,,,,,,,,,?

आईईई,,,,म्हणत मुलगा तिथेच हंबरडा फोडतो पण,,,
काहीही उपयोग नसतो आई गेलेली असते केव्हाच 

आणि त्या मुलाचा तिचे अंत होतो आईचं तो आवाज ऐकल्यावर ....

शुक्ला म्याडम यांनी आईची महती सांगताना हि गोष्ट सांगितली होती
खूप खूप रडलो होतो त्यावेळी आणि काल हि त्या मुंढव्याच्या घाटावर
असाच ढसढसा रडावस वाटत होत ती माझी आजी होतीच तशी
वेळ पडल्यास स्वतःच काळीज काढून देणारी ,,,,,
त्या माझ्या आजीला माझ्या कडून हि श्रद्धांजली .

तात्पर्य- परवाच एका मुलखाती सिंधुताई सकपाळ म्हणाल्या
या महाराष्ट्रात मेल्याशिवाय आपली किंमत कळत नाही ,,
त्या मुलाची तर वेगळी काय अवस्था होती ?
प्रेयसीने झिडकारल्या वरच  त्याला त्याच्या आईची किमत कळली
माझ्या मामाची आई ९२ वर्षे जगली काहीही त्रास न होता
आणि कुणालाही त्रास न देता
आणि मामाने हि तिला काही कमी पडू दिल नाही
आणि हव तर काय असत ८०\९०च्य माणसाला फक्त मुलाचे
चार प्रेमाचे शब्द काय बर वाटतंय  ना आई ?
बस्स ईतका विचारलं डोक्यावरून हात फिरवला तरी वडील धर्यांना
स्वर्ग चार बोट उरतो ,,,,,,आपण तेव्हड हि नाही करू शकत ?



Comments

  1. Hi Sunil,
    Sunil Phadke commented on your note "बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?".
    Sunil wrote: "Dada ............mast ! khup surekh ..."

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    See Comment

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Prathamesh Mhatre commented on your note "बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?".
    Prathamesh wrote: "Dev ekach vele la sarv thikani pochu shakat nahi. Manhun tyni Aai nirman keli."

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    See Comment

    ReplyDelete
  3. Hi Sunil,
    Katty Bawkar commented on your note "बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?".
    Katty wrote: "Its Realy Touching"

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    See Comment

    ReplyDelete
  4. Hi Sunil,
    Nanda Marathe commented on your note "बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?".
    Nanda wrote: "very touchy."

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    See Comment

    ReplyDelete
  5. Hi Sunil,
    Bhushan Korde commented on your note "बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?".
    Bhushan wrote: "Swami tinhi jagacha AAI vina bhikari."

    See the comment thread

    ReplyDelete
  6. Hi Sunil,
    Aditya Borde commented on your note "बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?".
    Aditya wrote: "khup sundar"

    See the comment thread

    ReplyDelete
  7. "Dada ............mast ! khup surekh ...""very touchy."

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...