Skip to main content

बाल गंधर्व एक असली मर्द

काल पुण्यातून येताना बालगंधर्व सिनेमा पहिला ,,,
त्यात एक हिरोईन स्वतः साठी साड्या घ्यायला एका दुकानात जाते .
आणि बाल गंधर्वांनी जशी साडी अमुक अमुक रंगाची वेलबुट्टीची
नाटकात घातली तसलीच साडी मला द्या . 

पण दुकानदार त्या साड्या नाही दाखवू शकत .
 आणि मग ती बाई बाल गंधर्वांच्या नाटकांचा पाढाच वाचते
अरे दुर्भाग्या तू यातलं एकही नाटक नाही पहिला?
तू बालगंधर्वांना नाही पाहिलास?
अरे मग आयुष्यात तू येवून काय पाहिलस?

ज्यांनी कुणी बाल गंधर्व नाही पहिला त्यांनी काही नाही पाहिलं,,,,अस म्हणत ती फणकार्याने निघून जाते ,,,,,
एक हि साडी न घेता,,,,,,,,,,
आणि हेच नेमक माझ्या शेजारच्या सीट वर घडत होत
माझी बायको हि सिनेमा पाहण्यासाठी आली होती
आधी वाटल होत हिला आवडेल कि नाही ?
काय म्हणेल हि ?
पण नाही तिला विचारलं कसा वाटला सिनेमा ?
विचारल्यावर ती ईतकच म्हणाली ,
अहो मी सिनेमा पहिलाच नाही
मी- मग काय पाहिलस ?
ती- मी फक्त सुबोध भावेला पाहत होते ,,,,,,
खरच बाल गंधर्व ईतके सुंदर दिसत होते
कस काय हो हे सगळ जमत होत
अस तर एखाद्या बाईला  हि नाही जमणार,,,
दुधाची आंघोळ ती काय अत्तराचा फाया काय
सुंदर सुंदर दागिने काय उंची सेट काय
काय ते लचकत होते ,काय ते सुंदर साडी नेसत होते ,
पदर तर अस्सा घेत होते कि मला हि नाही जमला तो आज पर्यंत
हावभाव तर एखद्या बाई ला लाजवतील असे होते ,,,,
आणि गायन तर खरच लोकमान्यांनी दिलेली पदवी अगदी योग्यच

आणि बाल गंधर्व सिनेमा पाहताना हे आपल्याला
पदोपदी जाणवत आपण एका गंधर्व युगाला मुकलो आहोत
सिनेमाची सुरवातच मुळी लहानग्या बालगंधर्वांच्या गायनाने होते
तल्लीन होवून नारायण गात असतो आणि आत कुठे तरी
टिळक महाराज काम करत असतात ते भारावून बाहेर येतात
गायन ऐकता ऐकता त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात
"अरे हा तर साक्षात बाल गंधर्व ",,,,,,
छोटा नारायण कुतूहलाने आपल्या मामाला विचरतो ,
"मामा बाल गंधर्व म्हणजे रे काय?
मामा म्हणतो नारायणा गंधर्व म्हणजे ,
"देवांच मनोरंजन करणारा गायक"
नारायण श्रीपाद राजहंस - बाल गंधर्व हि जणू त्यांची ओळखच झाली

आणि जस जसा सिनेमा उलगडत जातो तस तसा  ,
आपल्या ध्यानात येत अरे आपल्या नशिबात नव्हत ते देवपण
ज्यांच्या साठी बाल गंधर्व गायले ते खरोखर थोर नव्हे ते देवच
आपण,,,,,,,,,,,,,,?
अगदी सिनेमातील प्रत्येक प्रसंगाच पारायण कराव असा सिनेमा
अगदी छोटा प्रसंग ,
मुकेश रिशी त्याने यात पठणाच काम केल आहे तो अचानक
गांधर्वांसमोर उभा ठाकतो आणि आत्ताच्या आता माझे पैसे द्या
अर्थातच त्यांच्या पंडित नावाची मित्राने फसवल्या मुळे,,,
पण तो हि प्रसंग अगावर वर येतो
आणि मुकेश रिशी डायलोग मारतो  आपल्या सहकार्याला म्हणतो,
तुने कभी मर्द देखा ही क्या?
वो देख जा रहा  है,,,,,,,,,,,,,,
सुबोध भावेने प्रसंगच असा काही रंगवला आहे कि
मुकेश रिशी ला जरी हा डायलॉग दिला नसता तरी त्याने तो मारला असता .

बालगंधर्व,,,,
आपल्या तत्वांशी कायम चिटकून राहिले त्यासाठी त्यांनी अनेक मानापमान
हि सहन केले  मित्र दुरावले मुलगी गेली बायको गेली
म्हातारपणी गोहरजान चा डाग लागला .
त्यांची नाट्य संगीतावरील भक्ती अगदी नाईलाज म्हणून
धर्मात्मा सिनेमा केला पण ,,

त्याही क्षेत्रात फार काल नाही रमले त्याकाळचे सहा लाख आजचे किती ?
पण तेही शांताराम बापूनी देवू केलेले त्याकाळचे सहा लाख रुपये त्यांनी परत केले ,
शांताराम बापून समोर हात जोडून
बाल गंधर्व म्हणतात ,शांतारामा मला माफ कर तुझ हे सिनेमाच तंत्र मला नाही
दुर्दैव माझ ,,
त्यावेळी व्ही.शांताराम म्हणतात , दुर्दैव तुमच नाही आमच
आमच्या पिढीला बाल गंधर्व नाही पाहायला मिळणार

असा बाल गंधर्व पुन्हा होणे नाही असे ज्यांच्या बद्दल म्हंटले जाते
त्या महाराष्ट्राच्या दंत कथेवर नितीन चंद्रकांत देसाई आणि सुबोध भावे
यांनी सिनेमा काढून हे भाग्य आपल्या पदरात टाकलाय
यातील नाट्य संगीता विषयी काय बोलाव ?
आणि शेवटची ती ,
परवरदिगार परवरदिगार म्हणत मारलेली आत्र हाक
आख्खा सिनेमा या कव्वालीवर ओवळून टाकावा
ईतकी ती कव्वाली भारी जमलीय ,,,,

आज हि ज्यांनी कुणी हा 

सिनेमा नाही पहिला असेल त्यांनी तो जरूर पाहावा .
आणि त्या
महानायकाला हातात बांगड्या भरून मर्दुमकी गाजवणार्या
गंधर्व युगाला शतशः प्रणाम 


Comments

  1. Sanket Sk हेच या चित्रपटाचे यश आहे,.... नाही का ?
    July 1 at 4:22am · Like

    ReplyDelete
  2. film far sunder ahe baraka


    Umesh Raut

    9:19am Jul 1
    film far sunder ahe baraka

    ReplyDelete
  3. ज्यांनी कुणी बाल गंधर्व नाही पहिला त्यांनी काही नाही पाहिलं,,,,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...