Skip to main content

आही सारे शिक्षित अडाणी

||मातृ देवो भवः||
सार्या शिक्षित अडन्यांच्या चरणी,,
काल परवा मदर्स डे साजरा केला आपण सर्वांनी
काही तरी त्या निमित लिहाव असा वाट होत पण भट्टी जमत नव्हती आणि ,,,
मघाशीच कलर्स वरील बालिका वधू हि सिरीयल पाहत होतो
त्यातील प्रसंग ,,,
जग्याची आई त्याला शोधत शोधत मुंबईत येते ,,
आणि त्याची विनवणी करते कि,,
आनंदी कशी तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे
तिने तुझा जीव वाचवल आहे निदान त्याची तरी लाज बाळग
अस परोपरीने सांगते ,,
आम्हाला सार्यांना कशी तुझी गरज आहे
तुझी दादी मां वाट पाहतेय वैगेरे वैगेरे,,,,,,
पण जग्या ढिम्म ,,,
उलट तोच आईला सांगतो तू मला समजून घे
सारेच मला दोषी समजतात आधी वडील आले ते मला बोल लवून गेले
आता तू मला बोल लावत आहेस,,,वैगेरे वैगेरे
तेव्हा आई म्हणते जग्या अरे तू लहान होतस ना !
तुला बोलता हि येत नव्हत आणि मला तेव्हाही तुला काय पाहिजे
तुझ काय म्हणन आहे ते समजत होत,,,,,,

आता एक तर तू खूप मोठा झालायस आणि मी अडाणी अशिक्षित
तुझ हे तर्कट माझ्या नाही लक्षात येत अस म्हणत
हमसून हमसून रडत होती ती जग्याची आई ,,,,,,,,,
डोळ्यात पाणी आल अक्षरशः ,,,,

आणि साधारण १०\१२ वर्ष पूर्वीची हि गोष्ट आहे ,
मी त्यावेळी एकटाच होतो गावाला आम्ही नवीन घर बांधत होतो ना,
त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास सारखा चालूच असे
वाकड गाव माझ हिंजवडी पुणे जवळच,,,,,,
एकटाच होतो म्हणून दुपारच्य वेळेस गेलो एका हॉटेलात आणि
मिसळपाव खात होतो आणि
तितक्यात ५०\६० वर्षाची बाई आली डोक्यावरच जळनाच भलं  मोठ्ह ओझ
खाली टाकल आणि  मिसरीने काळवंडले दात पाण्याने चूल भरून साफ केले .
तिचे ते सुरकुतलेले हात ,लुगडं दोनचार जागी फाटलेले तसं ते हातान शिवलेले
एकंदरच तिच्या नशिबाची ते ओळख करून देत होते,,,,,
खाली बसून थरथरत्या हातांच दोनचार तांबे पाणी रिचवल
आणि हॉटेलातल्या पोऱ्याला आवाज दिला ,,,,,
"नुसतच कालवण मिळल कार पोरा माझ्याकडे भाकर हाय"
पोर्यान कालवण आणून दिल तसं फडक्यात बांधलेली
भाकर कुस्करून ती खावू लागली,,,,
ईकडे मी मात्र विचारात पडलो होतो , पण का कुणास ठावूक
एकंदरच तिच्याकडे पाहून मला तिची दया येत होती ,
मी ठरवलं आता तिचे पैसे मी भरतो तिला कदाचित कुणी नसेल
कोण हिला मदत करत असेल , हीच आजारपण कोण करत असेल
अशी वेळ का यावी तिच्यावर,,,?
असे सारे प्रश्न नाचत होते ,,,तो पर्यंत तीच खावून झाल होत
लगेच तो मघाचा पोर्या आला आणि म्हणाल ,
आजी मिसळ पाव घ्या गरम गरम हाये
पैस नाय घेणार ,,,,,,
पोरा आज तू मिसळ पाव दिशील र पर,,
उद्या ,,?उद्या कोण दिल मला मिसळ पाव?

त्यावर  तो पोर्या म्हणाला आजी तुला काय मुलगा
बिलगा न्हाय व्हय,,?
त्यावर ती आजी म्हणाली हाय कि मोठा सायेब हाय
ईन्जिनियर का काय तरी हाय त्यो,,,,,,
परदेशात आसतो त्येला येळच न्हाय,,,

खाडखाड  कुणी तर कानाखाली मारावी ते तिचे शब्द आठवले  ,,,
मघाशी ती आनंदी सिरीयल पाहताना
अगदी हुबेहूब  तसाच तर प्रसंग होता
आजच्या शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो,,,,,,,?
नकळतच प्रश्न डोक्यात आला ,
माणूस ईतका का बदलतो?
आपल संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी वाहणाऱ्या आईची
जराही आठवण त्याल येवू नये?
हाल अपेष्टात जगणाऱ्या माउलीची त्याला आठवण येत नसेल,,?
लहानाचा मोठा करणाऱ्या माउलीला  तो विसरू कसा शकतो,,?
आणि माझी ती तंद्री भंगली ,,,
त्या म्हताऱ्या आजीनेच माझ्या खांद्यावर हात ठेवला होता ,
आणि नकळतच पुन्हा एक तिने माझ्या मुस्कटात मारली ,,
ती म्हणाली," ईतका ईचार करू नकोस पोरा  बस्स तुझ्या
आई बापाला जप समद पावलं मला "

हे ऐकल्यावर तर मी लाजून मारायचा तेव्हडा बाकी होतो,,
दोन मिनिटात आजीने माझ्या मनातले विचार वाचले होते
आणि आम्हला आमच्या आई वडिलांना समजून घेता येत नाही,,?

ज्यांना आपली भाषा आपल्याला बोलता येत नसताना समजते  ,,,,,
कुठल्या शाळेत शिकतात हे सारे आई वडील,,,,,,,,?

आम्हाला समजते फक्त
सेटलमेंट , न्यू जॉब, तोडपानी ,ईनक्रीमेंट, भष्टाचार ,प्रमोशन ची भाषा
पण या सार्या घोळत आपण आपलीच मानस दुरावतो
काऊनटरवर पैसे दिले आणि विचार करतच चालू लागलो
आणि बाजूच्या शाळेच्या वर्गातून आवाज आला
मुलानो आज आपण काय शिकलो,,,?
डॉक्टर ईन्जिनियर नाही होता आले तरी चालेल
पण चागला मुलगा चांगला माणूस नक्की होवू या
नकळत मी स्वतःला उत्तर देत पुढे चालत राहिलो .
आज तो बालिका वधूने पुन्हा सारा प्रसंग जिवंत केला
कदाचित मीही कुठे तरी कर्तव्याला जागलो नसेन .
आणि तुम्ही,,,,,,?
म्हणूनच सार्या शिक्षित अडन्यांच्या चरणी.


Comments

  1. आही सारे शिक्षित अडाणी

    ReplyDelete
  2. Sunil Bhumkar yaans, saprem ,,

    अहो भूमकर साहेबानु, अगदी अक्षरशः भोक्काड पसरून रडायला लावलात हो.. तुमच्या सुम्बरान मध्ये "आम्ही सारे शिक्षित अडाणी" वाचले आणि आक्षी ओक्साबोक्शी रडावसं वाटले.. अगदी ठोक खरे लिहिले आहे.. आजकाल ची मुले अशीच आहेत.. ती बिचारी अशिक्षित अडाणी स्त्री होती व तिचा मुलगा इंजिनियर असून सुद्धा त्या मुलाला स्वतःच्या आई ची माया आठवली नाही व आपल्या श्रीमंतीत एकटाच लोळत राहिला.. मला माझे विद्यार्थी जीवन स्मरले व आमच्या आई ने हलाखीच्या दिवसातून कसे आमचे शिक्षण केले तेही आठवले.. अगदी माझ्याच जीवनाची गोष्ट तुम्ही माडर्न काळात सांगितली आणि मला माझी आई स्मरली.. धन्य आहांत हो तुम्ही खरोखर धन्य आहांत .. तुमचे आणत आभार ..

    --
    Thanx & Good Day,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल