दैनिक सकाळ ,दिनांक २१.३.११
स्पृहा जोशी यांनी हि कविता लिहिली आहे
खूप खूप वर्ष पूर्वीची गोष्ट आहे
रंगपंचमीच्या दिवशी सगळे रंग एकत्र जमायचे
ईंद्र धनुष्याच्या कमानीखाली धम्माल करायचे .
माणसाला तेव्हा म्हणे रंग म्हणजे काय ते कळतच नव्हते,,
त्या दिवशी रंग रंगपंचमी खेळताना ,,,,,,
एक माणूस त्यांना कोरडा दिसला ,
हसू विसार्ल्यासारखा,, रंगानं खूप वाईट वाटल ,
त्यांनी ठरवलं कि याचा आयुष्य रंगांनी भरून टाकायचं ,
आयष्य रंबिरंगी झाल कि तो हि हसायला लागेल,,,,,,,
त्याला हि भावना कळतील,
ईन्द्रधनुश्य होईल त्याच जगण
लाल रंग म्हणाल मी सळसळता उत्साह देईन,,,,,,
नारंगी म्हणाला मी देईन उर्जा शिकवेन त्याग ,,,
पिवळा म्हणाल मी देईन स्वच्छ विचार न अडखळनारे ,,
हिरवा म्हणाल मी देईन आनंद भरभराट ,,,
निळा शांतपणे म्हणाल मी देईन शांती,
आणि देईन ओढ असिमाची,,,,,,,
पारवा दूर बघत म्हणाला ,,,
माझ्या मुले शिकतील हे शहाणपण आणि सुखाने
विलीन होतील अनंतात ,,,
जांभळ्याने या सगळ्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाला,
मी देईन यांना पूर्णत्व ,,,
सारे रंग आनंदले त्यांनी आपल्याकडच हा ठेवा माणसाला
बहाल केला आणि ,,,,
माणसाचं कधी नव्हे ईतका आयुष्य सुंदर बनल ,!!!
पण रंगानी कुठे माणसाला ओळखल होत?
२१ षटका पर्यंत त्यांचा विश्वासच उडाला होता
माणूस नावाच्या प्राण्यावरून????????????
आज फिरून तीच मानस रंगपंचमीला एकत्र जमली होती,
पण हसत नव्हते केविलवाणे मात्र झाले होते,
हताश पणे एकमेकांकडे पाहत होते,,,
भडभडून आल त्यांना शेवटी बांध फुटला रंगाचा,,,,,,
आणि पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले,,,,,
डोळ्यात आणुनी उरला सुरला जीव
निष्पाप आठवे ज्याचा त्याचा देव !
भागव्याचे चाले येथे वैर हिरव्याशी
का चोर सोडूनी संन्याश्याला फाशी?
का निळा धावतो दलितांच्या उद्धारा?
अन देवांच्या हि डोळ्यास लागती धारा,
जगण्यातून हरवे का षड्जाचा सूर?
कोंडला सभोवती का सरणाचा धूर,
श्वासात वाहतो असा हा विषारी वारा
का तोंड दाबुनी वर बुक्क्यांचा मारा!!!!
रडणार कसे सुकले डोळ्यातले पाणी.
रंगांची बनली केवळ चलनी नाणी
रंगाचं सरले कसे मनाशी नाते
अन रंगमागून रंग आताशा जाते ,,,,,,!!!!!
Comments
Post a Comment