Skip to main content

आई, असं का ग केलंस?...

(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र...)
उरिया भाषेतील लेखक...
श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक 

हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. 
काय करावं ते सुचेना.त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून 
ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या
चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते.
मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं......
उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.

??????????????????????????????????????????????
आई, असं का ग केलंस??????????
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? 

तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; 

पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. 

आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, 

ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, 

तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे 

आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; 

पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची.
मग पोटात असूनही मी त्याला हळूच पायाने ढकलून द्यायचे.
तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. 

मला लागायचं.तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? 
कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!
कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 

'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे,,,?

माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल,
कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे, जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. 

मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही,
तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला.
आतल्या आत बराच मार बसला. 

मग तू पप्पांना गाडी हळू हळू चालवायला सांगितलस.
बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते.
तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती.
मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे.?????????????????????
त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर,बोर्शन करा..."?????????(म्हणजे राज रोस खून बरका)
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस,
हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी,
मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....
नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला???????

आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.?????????
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं 

असतस तरी चालल असत मला.??????
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे.??????

मला हे जग बघायचं आहे.??????
मलाही शाळेत जायचं आहे.????????
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आह?????????

हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.??????
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....
आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...
मग कशाला घाबरतेस....?'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........

हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....निदान हे वाचताना त्या अजाण  बालकासाठी दोन अश्रू जरी तुमच्या डोळ्यातून ओघळले तरी खूप आहे.

Comments

  1. "सर,अबोर्शन करा..."?????????(म्हणजे राज रोस खून बरका)eetak bhayank satya nako lhit javu sunil

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...