Skip to main content

गरीब कोण ?

अर्थात नजरेचा फरक ,,,,,,
एकदा एक अति श्रीमंत माणूस आपल्या मुलाला
जवळच्याच एका खेड्यातल्या शेतावर गेला,
तिथली ती गरिबी त्यालोकांच दारिद्र्य आपल्या मुलाने
अनुभवाव म्हणून तो त्याला घेवून गेला ,
आणि मग त्याला आपल्या संपत्तीच महत्व आणि
अपूर्वाई आपोआप कळेल .त्यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा
सदैव अभिमान राहील असा विचार करून
त्या खेड्यात त्या मुलाला तो घेवून आला होता.
ते दोघ बाप लेक त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतावर दोन दिवस राहिले .
आणि मग आपल्या गहरी परतल्यावर त्या बापाने
आपल्या श्रीमंती गुर्मीत विचारले
काय मग कशी वाटली ट्रीप? बघितलस ना गरीब लोक कस जगतात ?
यावर तो मुलगा म्हणाला हो हि ट्रीप मला खूपच आवडली,
आणि लक्षात  आल कि आपणच त्यांच्या पेक्षा जास्त गरीब आहोत,,,,,,
हे ऐकून बाप बेशुद्ध व्हायचा तेव्हडा बाकी होता,,,
बाप म्हणाल ते कस काय?
मुलगा म्हणाला
आपल्याकडे एक कुत्रा आहे ,त्यांच्या कडे चार कुत्रे आहेत,
आपल्या अंगणात पोहायचा छोटासा तलाव आहे
त्यांच्या कडे खूप मोठी खाडी आहे ,
ती कुठे संपते ते दिसतच नाही,
आपल अंगण गेट पर्यंत आहे
त्याचं अंगण क्षितिजाला जावून टेकल आहे,
आपलच काम करायला आपल्याला नोकरांची गरज पडते.
ते मात्र स्वतः ईतरांची सेवा करू शकतात.
आपण अन्नधान्य विकत घेतो,
ते मात्र स्वतः पिकवता,,,,,,
आपण आपल्या संरक्षणार्थ घराला भिंत बांधली आहे .
ते स्वतः स्वताःच संरक्षण करू शकतात.
तात्पर्य-सुख हे तुमच्या मानण्यावर असत
श्रीमंतीत लोळणार्या माणसाला मऊ गाद्या गिर्ध्यान वर झोप येत नाही .
काबाड कष्ट करणार्याला कुठे हि झोप येते
कारण तो सुखी आणि समाधानी असतो
श्रीमंतीत कसल आलय सुख आणि समाधान त्यात असते ती फक्त हाव.
हे सार आठवायचं कारण,,
चिंतामणराव देशमुख यांची गोष्ट ,,,,,
आयसीएस अधिकारी ,रिझर्व बँकेचे गव्हर्नर,
भारताचे अर्थमंत्री,, वैगेरे वैगेरे असूनही
चिंतामण रावांच्या मालकीचे साधे घरही नव्हते .
त्यांचा कोठेही फ्ल्याट नव्हता ,,,
आणि आज ,,,,,,,,,?
कित्येक आय ए एस अधिकारी,आमदार ,खासदार,
यांचे त्यांच्या मुलांचे नातेवाईकांचे, सग्या सोयर्यांचे
मित्र मैत्रीनंचे आदर्श टोवर मध्ये फ्ल्याट आहे
जे जवळ जवळ बाजार भावा प्रमाणे,
आठ आठ कोटींचे आहेत अर्थात हि खूप कमी रक्कम आहे
पण सांगितलं यासाठी पैसे खाताना
हे राजकारणी काहीही विधिनिषेध पळत नाहीत .
गरीब जवानांना हि सोडत नाहीत
बर निस्पृह किती असाव माणसान,,,?
१९२० ते १९५६ या काळात त्यांनी खूप पद भूषवली
त्याच काळात चक्क नेहरूंच्या हि अंगावर त्यांनी
त्यांचा राजीनामा फेकला होता,
कारण नेहरू मुंबई महाराष्ट्र पासून तोडू पाहत होते,,,,,,
पण तरीही नेहरू चिंतामण रावांची योग्यता जाणून होते .
त्यांनी परत त्यांना गळ घातली आणि राजीनामा मागे घेवून
परत कामावर रुजू व्हाहे असे सांगितले पण अस जर केल तर
माझा राजीनामा हे एक नाटक ठरेल तेव्हा मी फक्त
महिना एक रुपया या पगारावर काम करेन या
अटीवरच परत कामावर रुजू झाले ,,,,,,
पुढे काही दिवसातच "जागतिक निधी व्यवस्था "
पाहणाऱ्या समितीचे अध्यक्षपद चिंतामणरावांनी भूषवावे
अशी इंग्लंड आणि अमेरिका यांनी विनंती केली .
मुख्य पदाच्या जागेसाठी सर्व खर्च सोसून त्यांना त्यावेळी
३० हजार पौंड पगार मिळणार होता,,,,,,
खुद्द नेहरुनीही हि जागा सोडा आम्ही काही तजवीज करू
पण हाताची संधी गमावू नका असा सल्ला त्यांना दिला,
यात आपल्या देशाचा सन्मानच आहे,,,,,
आणि
चिंतामण रावांनी देश हितासाठी त्या ३० हजार पौंडांवर हि लाथ मारली .
आणि आपल्याला मिळणाऱ्या निव्वळ
एक रुपया पगारावर ते कायम राहिले ,,,,,
हे समाधान आज कुठल्या राजकारण्यामध्ये आहे?
शरद पवार ऐकताय का?
आज तुमच्या ईतका गरीब,,,,,,?माणूस महाराष्ट्रात
शोधूनही सापडायचा नाही आणि तरीही,,,,,,,,,?





Comments

  1. Zhakas khupach chaan. Pan aaj kal chya rajyakartyana he kalaycha nahi. Sukh he tumchya manyavar ast he 100 takke khar ahe. Je milel tyat sukh manla tarach manus sukhi hou shakt. Aaj kalchya jagat asa apan jaglo tar tyala alpasantushti manthat ani lok tomne martat.
    Jya tyacha dhrustikon. Apan aplya la hava tas jagaycha.

    ReplyDelete
  2. Vichar karnyasarkhi goshta ahe. Arthat, rajyakartyana he goshta samjat nahi. Swatahapurta baghne haa ekach udyog rajyakrtyana ahe... baki lok gele baa***.
    je prathamesh mhantat te dekhil khara... kami kamavla tar loka alpasantushta mhantat... pan tyanche tomne manawar ghyachi garaj nahi... sampooorna rajya vyavastha badlayla havi.
    Aprateem blog.

    ReplyDelete
  3. प्रथमेश ,रोहित आपण अल्पसंतुष्ट राहा अस नाही म्हणायचं मला
    पण कुठेतरी यासार्याला एक मर्यादा हवी हे नक्की नाहीतर त्या मिडास राजा सारखी अवस्था व्हायची
    हात लावेल तिथे सोन आणि एक दिवस त्याची स्वतःची लाडकी लेक तिला जवळ घेतो तर तीही सोन्याची होते
    अन्नाला हात लावतो तर तेही सोन्याच होत अस नको व्हायला
    पैसा हा ईतका हवा कि लोकां पुढे हात पसरायला लागू नये
    म्हणजेच त्या हातावर मावेल ईतकाच जास्त असला कि खाली पडणारा नको
    आणि खाली पडतो तो पैसा नव्हे आपली मुल मुली नातवंड बायको मित्र मैत्रीण
    हे पडतात म्हणजेच आपल्यापासून दूर जातात
    मग आपली सब टीव्हीची जाहिरात होते जो माझा सब के साथ ही वो अकेले में नही
    हे तेव्हा कळत पण उशीर झालेला असतो

    ReplyDelete
  4. facebook
    Hi Sunil,
    Anil Sipekar commented on your link.
    Anil wrote: "great man चिंतामणराव देशमुख"

    See the comment thread

    ReplyDelete
  5. facebook
    Hi Sunil,
    Vedhas Pandit commented on your link.
    Vedhas wrote: "wah wah!"

    See the comment thread

    Reply to this email to comment on this link.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...