||श्री||
||खंडोबा प्रसन्न||
स.न.वि.वि.
पत्रास कारण कि , मित्रांनो खूप वर्ष लोटली,
कुणाचे मला पत्र आले नाही कि
मी कुणाला पाठविले नाही.
तुम्ही शेवटचे आंतरदेशी पत्र , पोस्टकार्ड कुणाला पाठवले?
किंवा तुम्हाला कुणाचे आले? जर आठवून पाहा . .!
आज कपाट साफ करता करता एक पोस्टकार्ड फाईल मधून खाली पडले . .
आणि गहीवरुन आले . .
एक काळ होता किती महत्त्व होते . .या पोस्टकार्ड, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी, तार यांना . .
यांच्या शिवाय माणसांची नाती एकमेकांत घट्ट राहणे मुश्किल होते . .
काकांचे, मामांचे ,आजोळचे पत्र आले की ते वाचताना
सर्व मंडळी कशी त्या पत्रात डोळ्यासमोर साक्षात उभी राहत . .
त्या काळी आम्हा लहान मुलांचा पण खूप रुबाब होता .
त्यावेळी मी चौथी ,पाचवीला असेन .
रस्त्यावर कुठे पोस्टमन कुणाचे घर शोधत असला तर . .
लगबगीने ओ काका मला माहीत आहे त्यांचे घर . .चला मी दाखवतो . .
मग त्यांना त्या घरी नेऊन शाबासकी मिळवायची . .
जर त्या घरात कुणाला वाचता येत नसेन तर आपला रुबाब अजून वाढला . .
ऐ पिंटू हे पत्र वाच जरा कुणाचे आले आहे ?
मग त्यांना ते वाचून दाखवून खावू पण मिळवायचा . .किती रे हुशार तु . . आम्ही मेले अडाणी . .
किधी कुणाची चिठ्ठी, पत्र लिहून दे . . .
घरात वरती कौलालाच्या लाकडाला . .
ऐका तारेमध्ये कित्येक वर्षाची जुनी पत्रे जपून घुसवून अडकवलेली असायची . . .
किधी गरज पडली तर उपयोग होयचा . .शाहनिशा करायला . .
कधी कधी आजोबा आजीच्या मनात आले , तर पिंटू ते जरा टपाल काढून वाचून दाखव रे . .!
तार आली म्हणजे तर पोटात धडकिच यायची . .आता कोण गेले ?
असा पहिला विचार मनात येयाचा . .कधी कधी तर वाचण्या अगोदर घरात रडारडी सुरु होयाची . .
आपल्या गावचा कोणी गाववाला जर गावावरुन आला तर त्याच्या कडे हमकास चिठ्ठी देलेली असणारच . .
आता मात्र ते काही राहीले नाही . .
तो कागूद, पोस्टकार्ड ,तार, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी , सांगावा , निरोप , पतार . . .
सर्व भुतकाळ झाला आहे . .
तरी आता मी माझे पत्र संपवत आहे . .
तुम्ही सर्व आंनदात राहो हीच प्रार्थना करतो . .
येथील आजी, आजोबा यांना शाष्टांग दंडवंत . .
काका, काकी , मामा,मामी , मित्र यांना सप्रेम नमस्कार ,
आणि लहानांना शुभ आशिर्वाद आणि गोड गोड पापा . .
आपलीही खुशाली जरुर कळवावी आतुरतेने वाट पाहत आहे . .
कळावे
लोभ असावा . .
आपला
सुनील भूमकर

chhan lihile aahe..wachatana gahiwarun aale..pan shewati badal ha swikaravach lagato nahika..karan thambala to sampala
ReplyDeleteहो विकास खर आहे तुझा पण सर्व जून टाकून द्यायचं अस नाही ना ?
ReplyDeleteआणि वेळ जर आपल्या माणसांसाठी नसेल तर करायचा काय असल पुढे जाण
पुढे जाताना बरोबर आपली माणस हि हवीतच ना? नाही तर सब टीव्ही ची जाहिरात आठवते?
तो एकटाच माणूस आपला वाढदिवस साजरा करत असतो ,,,
आणि उदासवाणा हसत असतो मग खाली ओळ येते मजा सब के साथ है अकेले मी नाही..