Skip to main content

नीती आणि मूल्य


काल दुपारी मी रेडिओवर
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाण ऐकत होतो आणि नकळत त्या गाण्यात गुंतत गेलो खूप छान गाण आहे ते स्वतःची ओळख करून देणारे ,, स्वतःला जागे करणारे ,आपण कुणी तरी वेगळे आहोत मग कुणी का किती टिंगल करेना आपण आपला मार्ग सोडायचा नाही ,
जमेल तितक स्वतःला आरशात पाहायचं
कारण मनुष्याचा खरा मित्र कोण असेल तर तो आरसा .
या आरशात डोकावलं कि तुम्ही कोण आहात ते कळत.
स्वत्वाची जाणीव होते स्वतःच वेगळेपण जाणवत ,
अशावेळी ज्याला जाणीव झालीय स्वत्वाची
स्वतःत असलेला राजहंस पणाची त्याने तळ्यातला बद्कात
राहू नये त्याच्या साठी मोत्याचा चारा वाट पाहत असतो
त्याने झेप घ्यावी आसमंतात आणि हे राजहंस पण केवळ लाल बहादूर शास्त्रीं
मध्ये होत. म्हणून ते वेगळे होते ,,,,
बाकी सारीच तळ्यातली बदक .......
स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाची गोष्ट ,
शास्त्रीजींचा मुलगा सुनील
याला अलिशान मोटार गाड्यांचे खूप आकर्षण ,
परंतु शास्त्रीजींकडे न स्वतःची गाडी नव्हती त्याला त्याची ईच्छा दाबून ठेवावी लागे,
मात्र शास्त्रीजींकडे पंप्रधान म्हणून सरकारी गाडी होती .
ती मात्र अत्यंत महागडी आणि अलिशान होती,
एकदा सुनील ने शास्त्रीजींना न विचारता धाडस करून
त्या गाडीच्या ड्रायव्हरला फोन करून ती गाडी घरी घेवून
येण्यास सांगितले,
आता खुद्द पंत प्रधानाचा मुलगाच सांगतोय म्हंटल्यावर
ड्रायव्हर तरी नाही का म्हणेल आला घेवून गाडी,,,,,,,,
ड्रायव्हरने त्याला मस्त पैकी दिल्ली ची सैर करवून आणली .
दुसर्या दिवशी हि गोष्ट अर्थातच शास्त्रीजींना कळली,,,
तेव्हा त्यांनी त्या ड्रायव्हरल बोलवून घेतलं .
आणि गाडी किती किलोमीटर फिरली हे विचारलं,,
ड्रायव्हरने तो आकडा सांगताच
तो आकडा गाडीच्या लॉग बुक मध्ये नोंद करावयास सांगितले
व त्यापुढे खाजगी वापर अशी नोंद केली,,
आणि तेव्हड्या अंतराच भाड किती होईल अस ड्रायव्हरला विचारलं.
ड्रायव्हरने ती रक्कम सांगताच ,
शास्त्रीजींनी तेव्हडे पैसे त्याच्या हातावर ठेवले,
आणि ती रक्कम शासकीय खजिन्यात भरावयास सांगितले.
तात्पर्य-हि गोष्ट आदर्शाचा आदर्श ठेवणार्यांना कदाचित अतिरंजित वाटेल
पण नीती आणि मूल्य ज्यांना कशाशी खातात
हे माहित नाही त्यांना काय कळणार,,,,,,,,,,,,?

श्री. लाल बहादूर शास्त्रीजी , तुम्ही तुमच्या काळात दाखवलेली नैतिकता अजून हि आमच्या लक्षात आहे. तुम्हाला आमच नम्र अभिवादन!!!!!
आज लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ! शास्त्रीजी सारख्या व्यक्ती आपल्या राष्ट्राला लाभल्या हे आपल्या राष्ट्राच फार मोठ भाग्य आहे.

Comments

  1. शास्त्रींसारखी माणसे आताशा आभावानेच आढळतील ......इतर ठिकाणी आढळायची शक्यता तरी आहे पण दुर्दैवाने काँग्रेस सारख्या भ्रष्ट पक्षात तर नाहीच नाही....माननिय सोनियादेवींना शास्त्रींबद्दक कितपत माहिती असेल हाच प्रश्न मला भेडसावतोय.....मुर्ती लहान पण किर्ती मोठी हे वचन शास्त्रीसाठीच व्यवहारात आल असाव याची प्रचिती शास्त्रींचे चरित्र वाचताना पदोपदी येतेच..

    ReplyDelete
  2. Yogesh Deshpande commented on your post in Hindavi Swarajya Sena .
    गाडीचे झालेले भाडे सरकारी तिजोरीत स्वतः च्या खिशातून भरणारे शास्त्रीजी कुठे आणि जनतेच्या खिशातील पैशांनी स्वतः चे स्विस बँकेचे खाते भरणारे आजचे धुरंधर नेते कुठे?
    Yogesh Deshpande 7:44am Mar 3
    गाडीचे झालेले भाडे सरकारी तिजोरीत स्वतः च्या खिशातून भरणारे शास्त्रीजी कुठे आणि जनतेच्या खिशातील पैशांनी स्वतः चे स्विस बँकेचे खाते भरणारे आजचे धुरंधर नेते कुठे?

    ReplyDelete
  3. शास्त्रीजी खरोखर आपण महान होतात.

    ReplyDelete
  4. शात्रींच्या आचरणात असलेला प्रामाणिकपणातला थोडा जरी अंश आज प्रत्येकाने आपली अंगी बाळगला तरी काही प्रमाणात का होईना देशातील भ्रष्ट्राचार कमी होण्यास मदत होईल.

    ReplyDelete
  5. 10:14 AM (23 hours ago)
    ReplyReply
    More|
    Salunkhe, Anil
    Sunil, Gelyach varshi mi shir Lal bahadur shastri yanchya mulala eka karyakra...

    6:31 PM (15 hours ago)
    Salunkhe, AnilLoading...
    6:31 PM (14 hours ago)
    Salunkhe, Anil to me

    show details 6:31 PM (15 hours ago)

    Sunil,
    Gelyach varshi mi shir Lal bahadur shastri yanchya mulala eka karyakramat bhetlo hoto…
    Tyanchyashi hastandolan kartana…mala atyant anand hot hota ki lal bahadur shastrin
    sarkhya mahatmyachya mulala mi pratyaakshya bhetto aahe..
    Lal bahadur shastri yancha khoon Pakistan ne karastan rachun ani vishwas ghat karun kela he mala hallich kalale
    Tya shahid mahatmyas koti koti pranam…

    ReplyDelete
  6. 6:45 PM (14 hours ago)
    ReplyReply
    More|
    [Offline] sunil bhumkar to Anil

    show details 9:30 AM (6 minutes ago)

    वा वा अनिल मित्रा आज मला तुझा खूप हेवा वाटतो आहे तू अशा माणसाच्या मुलाला भेटलास की काय बोलू शब्द मुके झालेत खरच खूप भाग्यवान आहेस तू मित्रा त्याच्या पाकिस्तानने केलेल्या विश्वास घाताची नक्की काही माहिती मिळाली असल्यास मला जरूर कळव आणि हो कधी तरी तुझा हात मला हाहात घ्यायचा मोका दे दुधाची तहान निदान ताकावर मला तुझा हात हाहात घेताना तितकाच आनंद होईल जितका तुला लाल बहादूर शास्त्रींच्या मुलाचा हात हातात घेताना झाला असेल.

    2011/10/2 Salunkhe, Anil
    - Show quoted text -

    ReplyDelete
  7. Nayana Patil

    1:37am Oct 3
    हिमालयाच्या पायथ्याशी उभे राहिले कि आपल्याला कळते कि आपण किती छोटे आहोत ते !

    ReplyDelete
  8. uvkulkarni to me

    show details Oct 6 (1 day ago)

    jai javan jai kisan

    On Thu, 06 Oct 2011 02:19:11 +0530 wrote
    - Show quoted text -

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...